Phoenix Marketcity
Phoenix Marketcity Sakal
पुणे

Pune News : पुण्यातील प्रसिद्ध मॉलमध्ये मोठ्या अफरातफरीचा प्रकार; तपास सुरू

अक्षय बडवे

Phoenix Marketcity Fraud News : पुण्यातील एका प्रसिद्ध मॉलमध्ये पैशांची अफरातफरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

हेही वाचा : शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून

हा मॉल शहरातील विमाननगर परिसरात असून, विक्री केलेल्या वस्तूंची मिळालेली रक्कम कंपनीकडे जमा न करता स्टोअर मॅनेजरने कंपनीला लाखो रुपयांना चूना लावला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी फ्रान्सिस जोसफ डेव्हिड (३५) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, विमानगर परिसरात असलेल्या फिनिक्स मॉलमध्ये डेव्हिड स्टोअर मॅनेजर म्हणून कार्यरत होता. मात्र, डेव्हिडने मॉलमधील वस्तू विक्रीनंतर जमा झालेली २८ लाख १४ हजारांची रक्कम कंपनीकडे जमा केली नाही.

हा सर्व प्रकार मागील वर्षी ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान घडला असून या प्रकरणी प्रथमेश पैठणकर यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी पैठणकर हे फॉसिल इंडिया प्रा. लि. या कंपनीमध्ये एरिया मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. फॉसिल कंपनी म्हणजेच फिनिक्स मॉलमध्ये स्टोअर मॅनेजर फ्रान्सिस डेव्हीडने स्टोअरमधील कामगार तसेच कंपनीचे अधिकाऱ्यांना अनेक वेळा मॉलमधून विक्रीला गेलेल्या वस्तूंची खोटी माहिती दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

डेव्हिडने मॉलमधील महागडे घड्याळ, दागिने, बेल्ट, पाऊच, अशा तब्बल १४७ वस्तू स्वत:साठी वापरल्या. तसेच मॉलमधून विक्री गेलेल्या वस्तूंची जमा झालेली १९ लाख ४१ हजार रुपयांची रक्कम स्वत: कडे ठेवली.

ही रक्कम कंपनीत जमा न करता त्याने स्वतः वापरुन कंपनीला २८ लाख १४ हजार ४६० रुपयांना गंडा घातला. त्यानंतर पोलिसांनी डेव्हिडला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : गाडीची लाईट का चमकावली म्हणून २० जणांच्या टोळक्याकडून दोघांना मारहाण

IPL 2024 : हैद्राबादच्या वादळाने मुंबईच्या उरल्यासुरल्या आशा संपुष्टात... प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारी ठरली टीम

Latest Marathi News Live Update : राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता

BAN vs IND women T20 : टीम इंडिया शेवटही करणार गोड.? आज बांगलादेशविरुद्ध अखेरचा सामना

Salman Khan Firing Case: फक्त सलमान खानच नाही, तर इतर दोन प्रसिद्ध अभिनेतेही होते बिश्नोई गँगच्या रडारवर

SCROLL FOR NEXT