Pimpri Chinchwad post office work is pending due to server down  
पुणे

पिॆपरी चिंचवडमध्ये टपाल कार्यालयांतील कामकाज ठप्प कारण....

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : सर्व्हर डाऊन झाल्याने शहर परिसरामधील बहुतेक सर्व प्रमुख टपाल कार्यालयांतील कामकाज सुमारे साडेचार तासांहून अधिक काळ पुन्हा ठप्प झाले. त्यामुळे, नागरिकांची मोठी गैरसोय झाली. सर्व्हर बंद होण्याचे प्रकार वारंवार उद्‌भवत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहर परिसरात चिंचवड स्टेशन येथील उपटपाल (पूर्व विभाग) कार्यालयासह पिंपरी, यमुनानगर, भोसरी, आकुर्डी, चिंचवडगाव, प्राधिकरण आदी भागांत मोठी कार्यालये आहेत. या कार्यालयांमधून बचत खात्यामध्ये पैसे भरणे-काढणे, सेवानिवृत्ती वेतन अदा करणे, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, किसान विकास पत्र, आरडी, एमआयएस, पीपीएफ आदी कामे केली जातात. यापैकी, बहुतेक कामे ऑनलाईन स्वरुपाची आहेत. रजिस्टर किंवा पार्सलची कामे केवळ ऑफलाईन केली जातात. मागील काही महिन्यांपासून टपाल खात्याला 'सर्व्हर डाऊन' असल्याची समस्या वारंवार भेडसावत आहे. अधून-मधून सर्व्हरची गती मंदाविण्याचेही प्रकार घडतात. त्यामुळे, नागरिकांना नाहक रांगेत उभे रहावे लागते. 

आई रागावली म्हणून 12 वर्षीय मुलगी घर सोडून गेली अन् एका आजीने तिला...

चिंचवड (पूर्व) उप-टपाल कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, टपाल खात्याचे काम केंद्रीय पद्धतीने चालू असून त्याअंतर्गत म्हैसूर येथे खात्याचा मध्यवर्ती सर्व्हर आहे. आर्थिक व्यवहार हाताळण्यासाठी खात्याने "फिनाकल' नावाने सॉफ्टवेअर विकसित केले असून त्याअंतर्गत, ऑनलाईन कामे केली जातात. 3 वर्षांपूर्वी, बहुतेक सर्व मोठ्या कार्यालयांमधून सर्व्हर "बॅकअप'ची सुविधा होती. मात्र, मध्यवर्ती सुविधा लागू झाल्यापासून अचानक मध्यवर्ती सर्व्हर बंद होण्याची समस्या उद्‌भवत आहे. प्रमुख टपाल कार्यालयांबाहेर "एटीएम' ची सुविधा आहे. मात्र, सर्व्हरच बंद असल्याने नागरिकांना तेथूनही पैसे काढता येत नाहीत. ऑनलाईन कामकाज बंद झाले असले तरी ऑफलाईन कामे चालूच ठेवण्यात आल्याचा दावाही कर्मचाऱ्यांनी केला. सर्व्हर बंद झाल्याने सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 2 पेक्षा अधिक काळापर्यंत कार्यालयातील कामकाज ठप्प राहिले. 

कौन बनेगा करोडपतीमध्ये 25 लाखांची लॉटरी लागल्याचे सांगून गृहिणीची फसवणूक
 

टपाल खात्याचे ग्राहक विवेक नलावडे म्हणाले,""चिंचवड स्टेशन येथील टपाल कार्यालयामधून मला पैसे काढायचे होते. मात्र, कार्यालयातील सर्व्हर डाऊन आहे. ही समस्या वारंवार होत आहे. अनेकदा सर्व्हर मंदगतीने चालण्याची समस्या उद्‌भवते. कार्यालयांमध्ये पुरेशी रोकडही नसते. रोकड संपल्यावर नागरिकांचा खोळंबा होतो.'' 
दीपक होसमणी म्हणाले,"प्रधानमंत्री सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत मागील गुरुवारी मी पैसे भरण्यासाठी आलो होतो. मात्र, तेव्हा, देखील सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची समस्या निर्माण झाली होती. कार्यालयात 2 ते 3 वेळा चकरा मारल्याशिवाय कामे होत नाहीत.'' 

आता पीएमपी राबविणार दर महिन्याला 'बस डे`

आधारकार्डासाठी स्वतंत्र खिडकी हवी ! 
चिंचवड (पूर्व) उप-टपाल कार्यालयामध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून आलेले वाहन चालकांचे परवाने, नोंदणी पुस्तक पुण्यातील कार्यालयाकडे पाठविण्याचे काम केले जाते. याच ठिकाणी आधार कार्डाचेही कामकाज केले जाते. त्यामुळे, नागरिकांना जास्त वेळ थांबावे लागते. त्यामुळे, आधार कार्डासाठी स्वतंत्र खिडकी चालू केली जावी, अशी मागणी देखील होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tej Pratap Yadav : बिहार निवडणूक सुरू असतानाच केंद्र सरकारचा तेजप्रताप यादव बाबत मोठा निर्णय!

Kannad Election : उमेदवार शोधण्यासाठी राजकीय पक्षाची होतय दमछाक; कन्नडला अद्यापही युती, आघाडीसंदर्भात राजकीय पक्षांच्या हालचाली थंडच!

Bopodi Land Scam : बोपोडी जमीन व्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे; शीतल तेजवानीचे परदेशात पलायन?

Latest Marathi News Live Update : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

PMC Recruitment : पुणे महापालिकेतील कनिष्ठ अभियंता भरती प्रक्रिया निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT