Planning to start 560 bed Covid treatment centres in rural hospitals at ozar and Narayangaon, Junnar.jpg 
पुणे

जुन्नर तालुक्यात कोरोना वाढतोय; ५६० बेडचे कोविड केअर सेंटर सुरु करणार

रवींद्र पाटे, सकाळवृत्तसेवा

नारायणगाव : जुन्नर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने ओझर येथील सांस्कृतिक सभागृहात व नारायणगाव, जुन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात ५६० बेड असलेले कोविड  उपचार केंद्र सुरु करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात अत्यवस्थ कोरोना रुग्णांसाठी दोन व्हेंटिलेटर बसवण्यात येणार आहेत'' ,अशी माहिती आमदार अतुल बेनके यांनी दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ओझर व  नारायणगांव येथील प्रस्तावित कोविड उपचार केंद्राला भेट देऊन उपलब्ध सुविधा बाबतची माहिती घेतली. या वेळी आमदार अतुल बेनके, जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके, पंचायत समितीचे सभापती विशाल तांबे, तहसिलदार हनुमंत कोळेकर, गटविकास अधिकारी हेमंत गरिबे, वैद्यकीय अधिकारी डॉ वर्षा गुंजाळ, डॉ प्रशांत शिंदे,संतोष खैरे, सरपंच योगेश पाटे, अस्मिता कवडे, गणेश कवडे आदी उपस्थित होते.

समन्वय ठेवता येत नसेल तर वेगळा विचार करु - अजित पवार

आमदार बेनके म्हणाले, ''तालुक्यात रोज वीस ते पंचवीस नवीन कोरोना रुग्ण निष्पन्न होत आहेत. लेण्याद्री कोविड उपचार केंद्र अपूरे पडत असल्याने या पुढे लेण्याद्री केंद्र फक्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात येईल. ओझर येथील कोविड केंद्रात कोरोना रुग्णांच्या अति संपर्कात आलेल्या रुग्णांना दाखल करून त्यांची स्क्वॅब तपासणी केली जाईल. कोरोना साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी सोशल डिस्टिंगचे काटेकोर पालन करावे. कोविड केंद्रासाठी खर्च मोठा असल्याने शासकीय निधी कमी पडत आहे. स्वयंसेवी संस्था, सर्व पक्षीय कार्यकर्ते यांनी बेड, बाटली बंद पाणी, रुग्णासाठी जेवण आदिच्या मदतीसाठी तहसीलदार कोळेकर यांच्याशी संपर्क साधावा. प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन बेनके यांनी केले आहे.

...तर दुकानदारांचा परवाना होणार रद्द

मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद म्हणाले, ''नारायणगाव व जुन्नर येथील शासकीय रुग्णालयात प्रत्येकी तीस बेडचे कोविड उपचार केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शनिवारपर्यंत नारायणगाव ग्रामीण रुग्णालयाला दोन व्हेंटिलेटर दिले जातील. गरीब कुटुंबातील गरोदर मतांसाठी परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्र, महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत खाजगी रुग्णालये व चॅरिटेबल रुग्णालयात व्यवस्था आली आहे. कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी खाजगी डॉक्टरांची मदत घेण्यात येणार आहे.खाजगी डॉक्टरांना एनएचएमच्या दरानुसार मानधन दिले जाईल.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

SCROLL FOR NEXT