police.jpg
police.jpg 
पुणे

खाकीतील योद्ध्यांमुळे कोरोना बाधितांना मिळणार जीवदान

प्रफुल्ल भंडारी

दौंड (पुणे) : कोरोनाची बाधा झाल्यानंतर उपचाराने बरे झालेल्या दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) २५ पोलिसांनी अन्य कोरोना बाधितांवरील उपचारांसाठी प्लाझ्मा दान केले आहे. दौंड तालुक्यात पहिल्यांदाच पोलिसांकडून प्लाझ्मा दान करण्यात आले. 

दौंड शहरातील एसआरपीएफ गट क्रमांक पाच व गट क्रमांक सात यांच्या संयुक्त विद्यमाने अष्टविनायक मंगल कार्यालयात रक्तदान शिबिर घेण्यात आले. गट क्रमांक सातचे समादेशक श्रीकांत पाठक, गट क्रमांक पाचचे समादेशक तानाजी चिखले, ससून रक्तपेढीचे अधीक्षक डॅा. शंकर मुगावे, गट क्रमांक पाचचे वैद्यकीय अधिकारी डॅा. नितीन भोसले आदी उपस्थित होते. 

एसआरपीएफच्या दोन्ही गटांमधील एकूण ५६ पोलिसांनी रक्तदान केले. त्यामध्ये मे ते जून २०२० दरम्यान ज्यांना कोरोनाची बाधा झाली होती व जे उपचारानंतर बरे झाले अशा एकूण २५ पोलिसांनी प्लाझ्मा दान साठी रक्तदान केले. कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यापासून २८ दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाल्याने या २५ पोलिसांचे रक्त स्वीकारण्यात आले. गटाचे पोलिस कल्याण अधिकारी सचिन डहाळे, उप निरीक्षक मोहन कांबळे आदींनी या शिबिराच्या संयोजनासाठी पुढाकार घेतला. 

शरीरामध्ये रक्तातील तांबड्या व पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट्स वेगळ्या केल्यानंतर, रक्तातील जो द्रवभाग उरतो, त्यास प्लाझ्मा किंवा रक्तद्रव म्हणतात. प्लाझ्मा मध्ये सुमारे ब्याण्णव टक्के पाणी असते, पण आरोग्यास आवश्यक असलेले अन्य अनेक महत्वाचे घटक असतात. अत्यवस्थ कोरोना बाधितांवर ‘प्लाझ्मा थेरपी ’ प्रभावी ठरत असल्याने ही उपचार पद्धती राबविण्यात येत आहे.
              

७५ पैकी ६८ पोलिस बरे

दौंड तालुक्यात २९ एप्रिल ते १६ ऑगस्ट २०२० या कालावधीत एकूण ६७८ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामध्ये ग्रामीण भागातील ३२७, दौंड शहरातील २७६ व एसआरपीएफ आणि इंडियन रिझर्व्ह बटालियनच्या (आयआरबी) ७५ पोलिसांचा समावेश आहे. त्यापैकी उपचारानंतर ग्रामीण भागातील २७३, शहरातील २२६ व एसआरपीएफचे ६८, असे एकूण ५६७ जण बरे झाले आहेत. शहरातील १५ व ग्रामीण भागातील १०, असे एकूण २५ नागरिकांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. तालुक्यात सक्रिय बाधितांची संख्या ८६ इतकी आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT