plasma donation
plasma donation  Sakal Media
पुणे

आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील 85 जणांकडून प्लाझ्मा दान

डी. के. वळसे पाटील, मंचर

मंचर : येथील उपजिल्हा रुग्णालयातून काढण्यात आलेल्या “प्लाझ्मा वारी” उपक्रमात आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील ८५ प्लाझ्मा डोनर सहभागी झाले. भोसरी येथील संजीविनी ब्लड बँकेत त्यांनी प्लाझ्मा दान केले. त्यामुळे कोरोना बाधित अत्यावस्थ असलेल्या १७० रुग्णांना जीवदान मिळणार आहे. या उपक्रमाचे परिसरात कौतुक केले जात आहे.

कोरोनाच्या महाभयंकर संकटामुळे अनेक रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवून रेमडेसिवीर इंजेक्शन देऊनही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नाहीत. डॉक्टरांनी प्लाझ्माची गरज असल्याचे सांगितल्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ होते. ही समस्या दुर करण्यासाठी जुन्नर येथील किरणभाऊ गोत्राळ मित्र परिवार व मोरया प्रतिष्ठानच्यावतीने “प्लाझ्मा वारी" हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. प्लाझ्मा डोनरची नावे निश्चित केल्यानंतर रविवारी (ता.१६) प्लाझ्मा दान करणार्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यातून वैद्यकीय तपासणीत योग्य असलेल्या ८५ जणांची निवड करण्यात आली.

सोमवारी (ता. १७) मंचर उपजिल्हा रुग्णालयात मंचर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुहास बाणखेले, रुग्णकल्याण समितीचे सदस्य जगदीश घिसे, शरद बँकेचे संचालक दत्ता थोरात, राजा बाबु थोरात, लक्ष्मण थोरात, संजय बाणखेले, सुरेश निघोट, सुशील रोहिदास बाणखेले यांनी प्लाझ्मा दात्यांचे स्वागत करून त्यांची चहापान व नाष्ट्याची व्यवस्था केली. शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांच्या वतीने प्रत्येक प्लाझ्मा डोनरला शर्टपीस भेट देण्यात आला. संजीवनी ब्लड बँक भोसरी येथे तीन बसमधून प्लाझ्मा डोनर मार्गस्थ झाले. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्लाझ्मा डोनरचे अभिनंदन केले आहे.

गेली सव्वा वर्ष कोरोना बाधित अत्यवस्थ असलेल्या ५०० हून अधिक रुग्णांना प्लाझ्मा मिळवून देण्याचे काम केले आहे. व्हेंटिलेटर असताना ६० ते ६५ ऑक्सिजन पातळी असणाऱ्या रुग्णांना प्लाझ्मा दिल्याने त्यांचे प्राण वाचले आहे.ही प्रेरणा मला मंचर येथील सुहास बाणखेले यांच्यामुळे मिळाली आहे.-किरणभाऊ गोत्राळ, संस्थापक अध्यक्ष मोरया प्रतिष्ठान व किरणभाऊ गोत्राळ मित्र मंडळ निमगाव सावा (ता. जुन्नर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: सोशल मीडिया त्याला चांगला जमतो; लहानपणापासूनच नौटंकी...; Viral Videoवरून अजितदादांचा रोहित पवारांवर निशाणा

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

Mother's Day 2024: 'मदर्स डे' निमित्त आईसोबत करा दक्षिण भारतातील 'या' सुंदर ठिकाणांची भटकंती

Latest Marathi News Live Update: नरेंद्र मोदी अन् भाजपचा फोकस कोणत्याही किंमतीवर सत्ता मिळवण्यावर - सोनिया गांधी

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : कोल्हापूर-हातकणंगलेमध्ये मतदानावरुन वाद

SCROLL FOR NEXT