cv.jpg 
पुणे

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्लाझ्मा थेरपीची सोय नसल्याने रुग्णांची परवड

गजेंद्र बडे

पुणे ः अत्यवस्थ कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपी उपयुक्त आहे.
पण पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अद्यापही कुठेच प्लाझ्मा थेरपीची सोयच उपलब्ध नाही. म्हणून मी माझ्या वयोवृद्ध आईला उपचारासाठी पुणे शहरातील एका नामवंत रुग्णालयात उपचारासाठी आणले. पण आईसाठी आवश्‍यक असलेला
प्लाझमा काही मिळेना. शहरातील मोजक्‍याच रुग्णालयात ही सुविधा असून, ती केवळ त्यांच्याकडे दाखल असलेल्या रुग्णांसाठीच वापरली जात असल्याचा मला सांगण्यात आले.यामुळे पुणे शहरात आणूनही ग्रामीण भागातील रुग्णांची
प्लाझमासाठी मोठी परवड होत असल्याचा अनुभव पुणे जिल्हा परिषदेतील भाजपचे गटनेते शरद बुट्टे पाटील यांनी सांगितला.

मी स्वतः सार्वजनिक जीवनात वावरत असूनसुद्धा मला आलेला हा वाईट अनुभव आहे. माझ्या अनेकांशी ओळखी असल्याने, मी धडपड करू शकलो. अन्‌ या धडपडीनंतर ठाणे येथे प्लाझमा मिळाला. पण या घटनेने सर्वसामान्य रुग्णांनी करायचे काय, असा प्रश्‍न मला पडला आहे. या सर्वसामान्य रुग्णांची प्लाझमासाठी होणारी परवड थांबण्याची गरज आहे. यासाठी पुणे शहराच्या
धर्तीवर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांसाठी प्लाझमा
थेरपीची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी बुट्टे पाटील यांनी केली आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सुमारे पाच हजार कोरोना रुग्ण आतापर्यंत उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. या रुग्णांची संपूर्ण माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे उपलब्ध आहे. त्यामुळे अशा रुग्णांचा प्लाझमा जमा करण्यासाठी जिल्हा परिषदेने प्रयत्न करण्याची गरज आहे. याबाबत जिल्हा
परिषदेला तसे पत्रही दिल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र देऊन, शहराच्या धर्तीवर ग्रामीण भागातही प्लाझमा थेरपीची सुविधा उपलब्ध करून देण्याचा आदेश पवार यांनी विभागीय आयुक्त सौरभ राव यांना दिला आहे. शिवाय जिल्हा परिषदेनेही यासाठी
पुढाकार घेतला आहे.

यानुसार कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची माहिती जिल्हा परिषदेच्यावतीने एकत्रित करण्यात येत आहे. या माहितीनुसार प्लाझमा जमा करण्यासाठी सर्वांना जिल्हा परिषदेच्यावतीने प्लाझमा देण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. यासाठी सर्वांना जिल्हा परिषदेच्यावतीने आवाहन करणारे पत्र पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे आणि आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांनी सांगितले.

प्लाझमाबाबतचे धोरण बदला - बुट्टे पाटील

सद्यःस्थितीत पुणे शहरातील मोजक्‍याच रुग्णालयाकडे प्लाझमा उपलब्ध आहे. मात्र हे रुग्णालये केवळ त्यांच्याकडे दाखल असलेल्या रुग्णांसाठीच त्याचा वापर करतात.अन्य रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना याचा लाभ घेता येत नाही. यासाठी प्लाझमाबाबतच्या सध्याच्या धोरणात बदल केला पाहिजे. नव्या
धोरणात किमान प्लाझमा बॅगच्या बदल्यात बॅग उपलब्ध करून देणाऱ्यांना तरी तो उपलब्ध करून देण्याची गरज आहे. तरंच कुठे प्रत्येक गरजू रुग्णांना याचा लाभ मिळू शकेल. अन्यथा प्लाझमा उपलब्ध असूनही त्याचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे राज्य सरकारने किमान प्लाझमा रिप्लेस करण्याची सोय उपलब्ध
करून द्यावी, अशी मागणी शरद बुट्टे पाटील यांनी केली आहे.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय

T20 WC, IND W vs SA W: भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Khadakwasla Rain Update: खडकवासला धरण परिसरात तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

Sangli Crime Twist: वेदांत बंडगर खून प्रकरणाला नवे वळण; कुख्यात गुंड म्हमद्या नदाफ अटकेत, पोलिस कोठडीचे अधिकार राखून कारागृहात रवानगी

Paithan Road Crash : पैठण तालुक्यात भीषण अपघात; भरधाव पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालकांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT