PM_Narendra_Modi 
पुणे

कोंढणपूरच्या शेतकऱ्याला 'स्वामित्व'चा मान; पंतप्रधान मोदींच्या हस्ते मिळाली मिळकत पत्रिका

सकाळ वृत्तसेवा

पुणे : केंद्र सरकारच्या 'स्वामित्व' योजनेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्‍यातील मौजे कोंढणपूर येथील शेतकरी विश्वनाथ मुजुमले यांना ऑनलाइन मिळकत पत्रिका वितरित करण्यात आली. 

महसूल, भूमी अभिलेख, ग्राम विकास विभाग आणि राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 
जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक किशोर तवरेज, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख राजेंद्र गोळे, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर तसेच महसूल व भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते. चोक्कलिंगम यांच्या हस्ते मुजुमले यांना प्रत्यक्ष मिळकत पत्रिका वितरित करण्यात आली. 

राज्यातील गावठाण भूमापन न झालेल्या सर्व गावांचे गावठाणातील मिळकतीचे भूमापन करून मिळकतधारकांना मिळकत पत्रिका स्वरूपात अधिकार अभिलेख उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने ही योजना सुरू केली. या योजनेची यशस्विता आणि त्याचा ग्रामीण जीवनावर होणारा परिणाम पाहून केंद्र शासनाने ही योजना जशीच्या तशी स्वीकारलेली आहे. त्यानुसार या योजनेतंर्गत सहा राज्यातील 763 गावातील 1 लाख 32 हजार नागरिकांना मिळकतपत्रिकेचे वाटप मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यामध्ये हवेली तालुक्‍यातील कोंढणपूर येथील मुजुमले या शेतकऱ्याला मोदी यांच्या हस्ते मिळकतपत्रिका मिळण्याचा मान मिळाला.

 - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात मात्र काही मिनिटांतच तेजीत! कोणते शेअर्स वाढले?

MPSC Success Story: वीटभट्टी कामगाराच्या मुलाची जिद्दीने यशाला गवसणी; एमपीएससी परीक्षेतून बनला कृषी उपसंचालक, आई-वडीलांनी उपाशी राहून दिलं शिक्षण!

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! पाठ्यपुस्तकांबरोबर आता दफ्तरही मिळणार मोफत; ४२ लाख विद्यार्थ्यांना होणार फायदा

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Kolhapur Crime : आठ दिवस भीतीत, सोने विकल्यानंतर बिनधास्त; अखेर पंचवीस दिवसांनी संशयित पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT