पुणे

Modi in Pune: मराठीत भाषणाला सुरुवात; वाचा काय म्हणाले PM मोदी

सकाळ डिजिटल टीम

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज रविवारी मेट्रोसह (Metro) विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजनासाठी पुणे दौऱ्यावर (Pune Tour) आले आहेत. महापालिकेची निवडणूक (Municipal Election) पुढील काही महिन्यात होणार असल्याने भाजपने (BJP) यानिमित्ताने जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची जोरदार तयारी केली आहे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मोदींच्या दौऱ्याला विरोध नोंदवला आहे. आज MIT कॉलेजमध्ये मोदींची सभा पार पडली.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत भाषणाला सुरुवात केली आहे. त्यांनी म्हटलंय की, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले-सावित्रीबाई फुले, महर्षी कर्व्हे यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या पुण्यातील माझ्या बंधु-भगिणींना नमस्कार करतो. देश स्वातंत्र्याची पंच्याहत्तीर साजरी करतो आहे. भारताच्या स्वातंत्र्यामध्ये पुण्याचं योगदान ऐतिहासिक राहिलंय. लोकमान्य टिळक, चाफेकर बंधू, सेनापती बापट, गोपाळकृष्ण देशमुख यासारख्या अनेक स्वातंत्र्य सेनानींना आदरपूर्वक नमन करतो. आज महाराष्ट्राच्या विकासासाठी समर्पित राहिलेल्या रामभाऊ म्हाळगींची पुण्यतिथी देखील आहे. बाबासाहेब पुरंदरेंचीही मी आठवण काढतो आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

पुढे त्यांनी म्हटलंय की, काही वेळापूर्वीच शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं उद्घाटन करण्याचं सौभाग्य मला मिळालं आहे. पुणे मेट्रोच्या भूमिपूजनासाठी तुम्ही मला बोलावलं होतं. तसेच आज लोकार्पणासाठीही मला संधी तुम्ही दिलीत त्याबद्दल मी आभार मानतो. आधी भूमीपूजन झाल्यावर कळायचंच नाही की कधी उद्घाटन होणार आहे. हे यासाठी महत्त्वाचं की, वेळेवर प्रकल्प पूर्णत्वास नेले जाऊ शकतात, असा टोलाही त्यांनी याआधीच्या काँग्रेस सरकारला लगावला आहे.

आज मुळा-मुठेसाठी 1100 कोटींच्या प्रोजक्टवर काम सुरु होत आहे. आज पुण्याला ई-बसेसही मिळत आहेत. आज पुण्याच्या विविधता पूर्ण आयुष्यात एक सुंदर भेट मिळाली आहे. ती म्हणजे आर के लक्ष्मण यांची आर्ट गॅलरी पुण्याला प्राप्त झाली आहे. पुणे वासियांचं मी खूप अभिनंदन करतो. मी दोन्ही महापौरांना, त्यांच्या सहकाऱ्यांना खूप खूप सदिच्छा देतो. पुणे आपल्या सांस्कृतिक, आध्यात्मिक तसेच राष्ट्रभक्तीसाठी प्रसिद्ध राहिलं आहे. सोबतच पुणेने शिक्षण, रिसर्च आणि डेव्हलपमेंट, आयटी क्षेत्र आणि औद्योगिक क्षेत्रात प्रगती केली आहे. आमचं सरकार पुणेवासियांच्या गरजा लक्षात घेऊन अनेक प्रकल्पांवर काम करत आहे, असंही त्यांनी म्हटलंय.

पुढे त्यांनी म्हटलंय की, काही वेळापूर्वी मी मेट्रोने प्रवास केला. ही मेट्रो प्रवास सोपा करेल, प्रदुषणापासून मुक्तता करेल. कोरोना साथीदरम्यानही मेट्रो सेवेसाठी तयार आहे. आपल्या देशात गतीने शहरीकरण होत आहे. 2030 पर्यंत आपली शहरी लोकसंख्या 60 कोटींच्या पार जाईल. ही लोकसंख्या अनेक संधी प्रमाणेच आव्हानेही घेऊन येते. शहरात निश्चित सीमेमध्येच फ्लायओव्हर बनू शकतात. अशामध्ये आपल्याकडे एकच पर्याय आहे तो म्हणजे मास ट्रान्सपोर्टेशन.. त्याची अधिकाधिक निर्मिती करणे होय. त्यासाठी आमचं सरकार काम करत आहे. 2014 पर्यंत देशात फक्त दिल्ली NCR मध्येच मेट्रोचा विकास झाला होता. आज देशात दोन डझनाहून अधिक शहरांमध्ये मेट्रो एकतर सुरु झालीये अथवा तीचं काम सुरु आहे. यामध्ये महाराष्ट्रात पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई, नागपूर, ठाणेमध्ये मेट्रोचा विस्तार होत आहे. मेट्रोने प्रवास करण्याची सवय लावून घ्या. तुम्ही जितका प्रवास मेट्रोमधून कराल, तेवढी तुम्ही आपल्या शहराची मदत कराल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, प्रवीण दरेकर, प्रकाश जावडेकर, चंद्रकांत पाटील तसेच राज्यापला भगतसिंग कोश्यारी देखील उपस्थित आहेत. यावेळी मोदी पुणे महापालिकेच्या विविध योजनांचं उद्घाटन करत आहेत. यावेळी शिवकालीन जिरेटोप आणि तलवार देऊन मोदींचा सत्कार करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय की,

  • पंतप्रधान मोदीजी, राज्यपाल भगतसिंग कोश्यारींचं पुण्यात स्वागत

  • पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील अनेक महत्त्वाच्या प्रकल्पाचे भूमीपूजन आणि उद्घाटन झालं आहे.

  • जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचा उपमुख्यमंत्री या नात्याने मोदींची आभार

  • पुणेकरांच्या सहनशीलतेला दाद दिली पाहिजे. ठराव झाल्यानंतर बारा वर्षानंतर मेट्रो सुरु झाली.

  • पुणेकरांना मेट्रोच्या कामामुळे खूप त्रास सहन करावा लागला म्हणून तुमच्या सहनशीलतेला सलाम करतो. आणखी काही काळाकरिता तो सहन करावा लागेल.

  • मोदींना सांगू इच्छितो की, 2006 ला भूमिपूजन आणि 2014 मध्ये मनमोहन सिंगाच्या हस्ते मुंबई मेट्रोचं उद्घाटन झालं.

  • रखडलेल्या पुणे मेट्रो कामावरुन अजित दादांचा टोला

  • मला पंतप्रधान याना लक्षात आणून द्यायच आहे की काही मान्यवर व्यक्तीकडून अनावश्यक वक्तव्य केले जात आहेत ते महाराष्ट्राला परवडणारे नाही त्यामुळं याकडेही लक्ष द्यावे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT