PMP had to shut down on Shanipar Niljyoti route due to bullying of goons in pune.jpg 
पुणे

Video : धावत्या बसमध्ये घुसून कंडक्टरला लुटण्याचा प्रयत्न; गुंडाची दादागिरीत सिसिटीव्हीत कैद

सकाळवृत्तसेवा

पुणे : जनवाडीतील नीलज्योती परिसरात गुंडगिरीमुळे निर्माण झालेल्या दहशतीमुळे बस मार्ग बदलण्याची वेळ आली आहे. शनिपार - नीलज्योती (जनवाडी) हा मार्ग मंगळवारपासून बंद करण्यात आला आहे. या बाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी आरोपीं अद्याप मोकाट आहेत.

शनिपार - नीलज्योती (मार्ग क्रमांक 59) दरम्यान पीएमपीची बससेवा आहे. शुक्रवारी (ता. 14) सायंकाळी सहाच्या सुमारास बस नीलज्योती थांब्यावर उभी होती. वाहक कैलास रणदिवे हे चालक महादेव शिंदे यांच्याशी गप्पा मारत होते. तेवढ्यात मोटारसायकलवरून दोन युवक आहे. त्यांनी बसमध्ये प्रवेश केला आणि रणदिवे यांना मारहाण करण्यास सुरवात केली. त्यांना बसमध्ये आडवे पाडून रोकड लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. रणदिवे यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे हल्लेखोर दोन्ही युवक पळून गेले.

दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून तरुणाच्या डोक्यात सत्तूरने वार 

शनिपार ते नीलज्योती या मार्गावर या पूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे हा मार्ग पीएमपीने 17 फेब्रुवारीपासून बंद केला आहे. त्याऐवजी शनिपार ते जनवाडी (मॅफको कंपनी) या मार्गावर 18 फेब्रुवारीपासून बस धावेल, असे पीएमपीच्या स्वारगेट आगाराने म्हटले आहे. या मार्गावर यापूर्वी कंडक्‍टर, ड्रायव्हरला लक्ष्य करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. परिसरातील गुंडगिरीमुळे आता मार्ग बंद करण्याची वेळ पीएमपीवर आली आहे.

कानाखाली लगावली म्हणून दगडाने ठेचून निघृण हत्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

SCROLL FOR NEXT