PMP has informed Pune and Pimpri Chinchwad Municipal CorporationIt will not even be able to pay salaries to employees 
पुणे

...तर पीएमपी कर्मचाऱ्यांना पगारही देऊ शकणार नाही!

मंगेश कोळपकर

पुणे : उत्पन्नाचे स्त्रोत आटल्यामुळे कर्मचाऱ्यांना सप्टेंबरचा पगार देणेही अवघड होणार असल्याचे पीएमपीने पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेला कळविले आहे. दोन्ही महापालिकांकडून गेल्या पाच महिन्यांपासून एक रुपयाही पीएमपीला मिळालेला नाही. त्यामुळे बससेवा सुरू ठेवायची असेल तर, दोन्ही महापालिकांनी मिळून 183 कोटी रुपये पीएमपीला तातडीने द्यावेत, असे पीएमपीने कळविले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पीएमपीची 20 मार्चपासून बंद असलेली प्रवासी वाहतूक 3 सप्टेंबरपासून सुरू झाली. तत्पूर्वी पीएमपीचे सरासरी दैनंदिन उत्पन्न 1 कोटी 48 लाख रुपये होते. त्यानुसार एक एप्रिल ते 31 ऑगस्ट दरम्यान पीएमपीचे 226 कोटी रुपये 44 लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. पीएमपीचे सध्या 4 लाख रुपये सरासरी उत्पन्न आहे. तसेच जाहिरात ठेकेदारांनी पीएमपीकडे भाडे भरलेले नाही. त्यामुळे पीएमपीची आर्थिक स्थिती गंभीर झाली असून तातडीने काही निधी न मिळाल्यास पुढील महिन्यांत कर्मचाऱ्यांना पगारही देता येणार नाही, असे पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांनी दोन्ही महापालिकांच्या आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. 

एसटी महामंडळ अडचणीत आल्यावर राज्य सरकारने सुमारे 550 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. त्या धर्तीवर दोन्ही महापालिकांनी पीएमपीला निधी द्यावा. दोन्ही महापालिकांकडून संचलनातील तुटीपोटी पीएमपीला दरमहा 23 कोटी रुपये मिळत होते. परंतु, गेल्या पाच महिन्यांपासून ती रक्कम मिळालेली नाही. प्रवासी भाड्यातून मिळणारे उत्पन्न कमालीचे घटले आहे. त्यामुळे पुणे महापालिकेने 110 कोटी 15 लाख रुपये तर, पिंपरी चिंचवड महापालिकेने 73 कोटी 43 लाख रुपये पीएमपीला उपलब्ध करून दिल्यास दोन्ही शहरांत वाहतूक सुरू ठेवता येईल, असे जगताप यांनी स्पष्ट केले आहे. 

लोकहो, आता... ‘शिस्त देवो भवः’

महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) कंपनीला इंधनासाठीच सुमारे 18 कोटी रुपये, नव्या बसचे 13 कोटी 42 लाख, ई- बसचे 10 कोटी 28 लाख रुपये, कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिले सुमारे 9 कोटी रुपये द्यायची आहे, असे पीएमपीने पत्रात स्पष्ट केले आहे. पीएमपीला सुमारे 10 हजार कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी दरमहा सुमारे 35 कोटी रुपये द्यावे लागतात, याकडेही त्यात लक्ष वेधण्यात आले आहे. 

बससेवा सुरू ठेवण्यासाठी निधी मिळावा यासाठी पीएमपीचे पत्र मिळाले आहे. त्याबाबत विचारविनियम सुरू आहे. निधी कसा आणि किती द्यायचा, या बाबत येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल. 
- विक्रमकुमार ( पुणे महापालिका आयुक्त)

दहा वर्षे झोपा काढल्या! ‘ब्लू प्रिंट’कडे दुर्लक्षामुळे पुणे झाले ‘हॉटस्पॉट’​

 सलग पाच महिने प्रवासी वाहतूक सेवा बंद असल्यामुळे पीएमपीची आर्थिक स्थिती गंभीर झाली आहे. ही वाहतूक सुरू ठेवण्यासाठी दोन्ही महापालिकांनी पीएमपीला तातडीने मदत केली पाहिजे तर प्रवाशांना सेवा देता येईल. पीएमपीच्या आर्थिक स्थितीची माहिती दोन्ही महापालिकांना देण्यात आली आहे. 
- राजेंद्र जगताप (अध्यक्ष, पीएमपी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

Dhule Crime : दारूच्या नशेत पत्नीवर प्राणघातक हल्ला, धुळे कोर्टाने सुनावली ५ वर्षांची शिक्षा

SCROLL FOR NEXT