पुणे

तीन एप्रिलपूर्वीच्या पीएमपी पासला पुण्यात मिळणार मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा

पुणे ः प्रवाशांनी तीन एप्रिलपूर्वी काढलेल्या पासची मुदत वाढवून देण्यात येणार असल्याचे पीएमपी प्रशासनाने शुक्रवारी जाहीर केले. मात्र, प्रवाशांना पास केंद्रांवरून त्यांची मुदत वाढवून घ्यावी लागणार आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर होणेपुर्वी अनेक नोकरदार, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांसह नियमित प्रवाशांनी पास केंद्रावरून पीएमपीचे बस पासेस काढलेले आहेत. परंतु, ३ एप्रिल रोजी अचानक लॉकडाऊन जाहीर झाल्याने अशा पासधारकांना बस पासचा वापर करता आलेला नाही.

पीएमपीची वाहतूक ६ जूनपासून सुरू झाली आहे. त्यामुळे स्वारगेट, हडपसर बसस्थानक, मनपा, डेक्कन, पुणेस्टेशन (मोलेदीना), वाघोली, कात्रज, वारजे माळवाडी, निगडी, चिंचवड गाव, पिंपरी चैक (लोखंडे सभागृह), पिंपळे गुरव, भोसरी (शिवाजी चौक) आळंदी, सासवड, उरूळीकांचन व राजगुरूनगर या पास केंद्रांवर संबंधित पास धारकांचे अर्ज स्वीकारून त्यांना मॅन्युअल पास व मी-कार्ड पासची मुदत वाढवून देण्यात येणार आहे. तरी संबंधित पासधारकांनी अर्ज व मुळ पाससह वर नमुद केलेल्या पास केंद्रांवर २० जूनपर्यंत पासवर मुदत वाढवून घ्यावी. त्यानंतर कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही, असे पीएमपी प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : "...तर सेवेचा राजीनामा द्या अन् संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा"; राज ठाकरेंची IPS विश्वास नांगरे पाटलांवर टीका

Malvan Swimming Pool VIDEO : काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ! स्विमिंग पूलमध्ये उंचावरून मारली उडी, डोकं तळाशी जोरात आपटलं, 25 वर्षीय युवकाचा दुर्दैवी अंत

Latest Marathi News Live Update : विशाळगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात; मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती

Mumbai Water Supply: मुंबईवर कपातीचे संकट! धरणांनी गाठला तळ, अत्यल्प पावसामुळे चिंता

Video Viral: जग पाहता येत नाही... पण बापाच्या शब्दांनी रोनाल्डोचा गोल अनुभवला; लेकाची रिअ‍ॅक्शन डोळे पाणावतील

SCROLL FOR NEXT