Pune-Metropolis 
पुणे

रिंगरोडची रुंदी होणार कमी; ‘पीएमआरडीए’चा निर्णय

उमेश शेळेके

पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या रिंगरोडची रुंदी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पुन्हा एकदा ट्रॉफिक सर्व्हेक्षणाचे काम सुरू केले असून त्यानंतर तो ४५, ६० किंवा ६५ मीटर रुंदीचा करायचा?, याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच, या रिंगरोडची लांबी कमी झाली असून तो आता सुमारे ८५.६३ किलोमीटर लांबीचा असणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पीएमआरडीएने प्रादेशिक विकास आराखड्यातील रिंगरोड विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण १२३.९७ किमी लांबीचा हा रिंगरोड होता. पहिल्या टप्प्यात तो ९० मिटर रुंदीचा होता. परंतु, मध्यंतरी एमएसआरडीसीच्या रिंगरोडप्रमाणेच तो ११० रुंदीचा करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता पुन्हा रुंदी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत रिंगरोडची रुंदी कमी करण्यास तत्त्वतः: मान्यता दिली असल्याचे पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

ओव्हरलॅपमुळे निर्णय
पीएमआरडीएचा रिंगरोड १२३ किलोमीटर लांबीचा होता. परंतु पीएमआरडीए आणि एमएसआरडीसी या दोन्ही रिंगरोडमध्ये सुमारे १५ किलोमीटरचे अंतर आहे. दोन्ही रिंगरोड काही गावांमध्ये एकमेकांना ओव्हरलॅप होतात. त्यामुळे ज्या गावांमध्ये हे दोन्ही रिंगरोड एकमेकांना ओव्हरलॅप होतात, अशा गावांमधील सुमारे ३८.३४ किलोमीटरचा एमएसआरडीसीचा रिंगरोड वगळण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. मध्यंतरी तो पुन्हा एमएसआरडीकडे वर्ग केला. त्यामुळे पीएमआरडीएचा रिंगरोड आता ८५.६३ किलोमीटर लांबीचा होणार आहे.

रिंगरोडची रुंदी कमी करण्याची कारणे
१) पीएमआरडीएने हाती घेतलेला रिंगरोड १९८७ च्या प्रादेशिक आराखड्यातील आहे. दरम्यानच्या कालावधीत या रस्त्यावर अनेक ठिकाणी बांधकामांना परवानगी दिली. त्यामुळे भूसंपादन करताना अनेक अडचणी येणार असून खर्चही वाढण्याची शक्यता आहे. 
२) या रिंगरोडला मोठा विरोध होत आहे. रिंगरोडसाठी निधी उपलब्ध करून देण्यास सरकार तयार नाही आहे. 
३) या रिंगरोडपासून १५ किलोमीटर अंतरावरूनच एमएसआरडीसीचा सुमारे ११० रुंदीचा रिंगरोड जाणार आहे. त्यामुळे एवढ्या कमी अंतरावरून जाणारे हे दोन्ही रस्ते एकाच रुंदीचे करणे योग्य होणार नाही.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये....
एकूण रिंगरोड ८५.६३ किमी लांबीचा
पहिल्या टप्प्यात ३३ किमी लांबीच्या रिंगरोडचे नियोजन
रस्त्याची ११० मीटरची रुंदी कमी होणार 
पुणे-सातारा ते नगर रोडला जोडला जाणार
रिंगरोडला जोडणाऱ्या ४२ रस्त्यांचाही होणार विकास
टीपी स्किमच्या माध्यमातून भूसंपादनाचे नियोजन 
हवेली, खेड, मावळ आणि मुळशी तालुक्यातून जाणार

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Audio Clip: उद्घाटनाच्या कार्यक्रमाला 70 हजार रुपये; हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचा रेट फिक्स! ऑडिओ क्लिप व्हायरल

हृदयद्रावक! ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या संघातील फुटबॉलपटू Diogo Jota चा कार अपघातात मृत्यू, १० दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न

Thackeray Rally: मुंबईत ५ जुलैला ठाकरे बंधूंची संयुक्त रॅली, तयारीसाठी बैठकांचा सपाटा, पण अजून पोलिसांची परवानगी नाही

Nashik Police Transfers : नाशिक पोलिस उपायुक्तांच्या बदल्या; नवीन नियुक्तीला उशीर का?

‘गुलाबी साडी’ फेम संजू राठोडची मराठी गाणी बॉलिवूडमध्ये झळकणार....

SCROLL FOR NEXT