Vadgaon_Sheri_Ghee 
पुणे

साडेसातशे लिटर भेसळयुक्त तूप जप्त; वडगावशेरीतील कारखान्यांवर 'एफडीए'चे छापे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : वडगाव शेरीत भेसळयुक्त तूप बनवणाऱ्या दोन कारखान्यांचा काळाबाजार पोलिसांनी उघडकीस आणला आहे. दोन्ही कारखान्यांच्या गोडाऊनवर गुन्हे शाखेचे पथक आणि अन्न व औषध प्रशासनाच्या पथकांनी संयुक्त कारवाई करत शनिवारी (ता.१२) छापा टाकला. या कारवाईत साडेसातशे लिटर भेसळयुक्त तूप, कच्चा माल आणि साधनसामग्री असा सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी साहिल मेहंदी भानोडिया आणि दिनेश मेहंदी भानोडिया (दोघे रा. मूळ उत्तरप्रदेश) या भावांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वडगाव शेरी परिसरात भेसळयुक्त तूप तयार केले जात आहे. ते तूप दोन्ही आरोपी वेगवेगळ्या ठिकाणी विकत आहे, अशी माहिती खबरीकडून गुन्हे शाखेस मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी अन्न व पुरवठा अधिकारी यांच्याशी संपर्क साधला.

अप्पर पोलिस आयुक्त अशोक मोराळे, पोलिस उपायुक्त गुन्हे बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी आणि अमली पदार्थ विरोधी पथकाचे (पश्‍चिम) वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोहिते, पोलिस उपनिरीक्षक महाडीक कर्मचारी मनोज शिंदे, महेश कदम, फिरोज बागवान, मंगेश पवार, प्रमोद टिळेकर, अमोल पिलाणे, साहिल शेख, प्रदीप गाडे, रूपाली कर्णवर यांचे पथक आणि एफडीएचे अधिकारी यांनी संबंधित गोडाऊनवर छापा टाकला.

'एफडीए'चा परवाना नाही :
दोघे आरोपी मूळचे उत्तर प्रदेश राज्यातील आहेत. गेल्या वर्षापासून ते तुपाचे उत्पादन करीत होते. त्यांच्याकडे एफडीएचा परवाना नाही. ज्या ठिकाणी ते उत्पादन करीत होते, तेथे मोठ्या प्रमाणात अस्वच्छता होती. तेथील भांड्यात उंदीर आढळून आले आहेत. पुढील कारवाई अन्न व पुरवठा अधिकारी करीत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT