three arrested for kidnapping a boy in pune 
पुणे

पुणे: उधारी मागतोस का? तुझा धंदा बंद करेल...

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पान टपरी धारकांना माल पुरवठा करणाऱ्या तरुणाने उधारीचे पैसे मागितल्याच्या कारणावरुन त्याचे अपहरण करुन त्यास जबर मारहाण करण्यात आली. तसेच तरुणाकडील पन्नास हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना बाणेर परिसरामध्ये सोमवारी भरदिवसा घडली. दरम्यान, चतुःश्रृंगी पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करुन तिघाजणांना तत्काळ बेड्या ठोकल्या. 

अरुण नागेंद्र सिंह (वय 27, रा. बालेवाडी गाव), सुरज राजु चौघुले (वय 27, रा. वडारवाडी), राहुल बडीवार सोनकांबळे (वय 19, रा. महादेवनगर, हिंगणे खुर्द) अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी शिवा फुलचंद प्रजापती (वय 19, रा. शिवणे, एनडीए रोड, मुळ रा. उत्तरप्रदेश) यांनी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पुण्यात परदेशी महिलेने मागितली लिफ्ट मग बलात्कार अऩ्...
 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मावस भावाचा पान टपरी धारकांना सिगारेट, तंबाखु, गुलकंद, सुपारी व बडीसोप पुरविण्याचा व्यवसाय आहे. ते मावस भावाला त्याच्या कामामध्ये मदत करतात. तसेच टपरीधारकांकडील उधारीचे पैसे वसुल करण्याचेही काम करतात.

पुणे-मुंबई मार्गाने उद्या प्रवास करणार आहात? मग ही बातमी वाचा

सोमवारी दुपारी ते मावस भावाची कार घेऊन त्यामध्ये पान टपऱ्यांसाठी लागणारा माल घेऊन वारजे माळवाडी येथून पाषाण, सुसरोड, औंध या ठिकाणी आले. दुपारी तीन वाजता ते बाणेर येथे आले. तेथील पान टपरीधारकांना माल देऊन ते घरी जाण्यासाठी निघाले असताना अचानक दोघेजण त्यांच्या गाडीमध्ये बसले. त्यांनी फिर्यादी यांना दमदाटी करीत गाडी पुढे नेण्यास सांगितली. धारदार शस्त्राचा धाक दाखवून त्यांना गाडी महामार्गाच्या दिशेने नेण्यास सांगितली. त्यानंतर गाडी सुस पुलाजवळ थांबविण्यास सांगून फिर्यादीस मारहाण केली. फिर्यादीकडे पान टपरी धारकांकडून जमा झालेली 50 हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेतली. त्यानंतर फिर्यादीस जबर मारहाण करीत "अरुण सिंगकडे उधारी मागतोस का ? तुझा धंदा बंद करेल' अशी धमकी देत फिर्यादीस सोडून दिले. त्यानंतर फिर्यादीने हा प्रकार मावास भावाला सांगून चतुःश्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली.

ख्रिसमसच्या दिवशीच होणार पुणे-मुंबई रेल्वे प्रवाशांची गैरसोय; 'या' गाड्या उद्या रद्द

वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक समीर चव्हाण, पोलिस हवालदार मुकुंद तारु, पोलिस नाईक विशाल साबळे यांच्या पथकाने तांत्रिक विश्‍लेषण व खबऱ्यांकडील माहितीद्वारे आरोपींचा शोध घेऊन त्यांना तत्काळ अटक केली 
Video : कचऱ्यातले गाठोडं उघडलं अन् बाळं दिसलं...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

SCROLL FOR NEXT