daund market 
पुणे

संतापजनक, शेतकऱ्यांनी घाम गाळून पिकविलेल्या शेतमालावर पोलिसांचा डल्ला 

प्रफुल्ल भंडारी

दौंड (पुणे) : दौंड शहरात गस्तीवरील काही पोलिसांकडून शेतमालाची वाहतूक करणाऱ्या टेम्पोमालकांना दमदाटी करून दररोज शेतकऱ्यांचा भाजीपाला काढून घेण्याचा घृणास्पद प्रकार सुरू आहे. बाजार समितीकडे जाणाऱ्या प्रत्येक टेम्पोतून मागील आठ दिवसांपासून शेतमाल बळजबरीने काढून घेतला जात आहे.

याबाबत दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव तात्यासाहेब टुले यांनी १७ जुलै रोजी दौंड पोलिस ठाणे व दौंड पोलिस उप अधीक्षक कार्यालयात लेखी तक्रार केली आहे. बाजार समितीत सकाळी भाजीपाल्याचा लिलाव होतो व त्यासाठी पहाटेपासून दौंड व शेजारील तालुक्यातून शेतकरी टेम्पोतून शेतमाल आणतात. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भाजीपाला उत्पादक स्वतः शेतमाल घेऊन न जाता ओळखीच्या टेम्पोमालकाकडे पोते व प्लॅस्टिक क्रेटमध्ये भाजीपाला लिलावासाठी पाठवितात. परंतु, रेल्वे उड्डाण पूल येथे गस्तीवरील काही पोलिस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवान तपासणीच्या नावाखाली शेतमालाची वाहतूक करणारे वाहन अडवत आहेत. 

वाहतुकीसाठी आवश्यक परवाना, तोंडाला मास्क, मंजूर क्षमतेएवढेच शेतमालाची वाहतूक, वाहनाची कागदपत्रे, आदी बाबींची पूर्तता केलेली असताना वाहने अडविले जात आहेत. तपासणीदरम्यान पोलिस कर्मचारी टेम्पोचालकास टेम्पोच्या आत जाण्यास सांगून क्रेट व पोत्यांमधील कोथिंबिर व मेथीच्या गड्ड्या, वांगी, दोडका, भोपळा, आदी काढून द्यायला सांगतात. टेम्पोचालकाने नकार दिल्यास किंवा टाळाटाळ केल्यास त्यांना कारवाईची भीती दाखवत दमदाटी केली जात आहे. शेतकरी हे वजन करून भाजीपाला व शेतमाल टेम्पोमालकाकडे देतात. परंतु, लिलावानंतर पट्टीमध्ये शेतमाल वजनाला कमी भरत असल्याने टेम्पोमालक आणि शेतकर्यांमध्ये वजनावरून वाद होत आहेत. 

याबाबत शेतमालाची वाहतूक करणाऱ्यांनी बाजार समिती प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर बाजार समितीच्या वतीने पोलिसांकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी करून कारवाईचे आश्वासन दिले आहे. 
  
Edited By : Nilesh J. Shende

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS DHONI: धोनीने CSK मध्ये २५ टक्के हिस्सा मागितला? अखेर फ्रँचायझीने मौन तोडलं; माहीच्या IPL भविष्याबाबतही मोठं अपडेट

धक्कादायक! चार महिन्यांत २०० हून अधिक कैद्यांना HIV ची लागण, सरकारकडून चौकशीचे आदेश

Bank Holiday: सप्टेंबरमध्ये बँका 14 दिवस बंद! सलग 4 दिवस बँकांना सुट्टी; महाराष्ट्रात किती दिवस बँका बंद?

UPI AutoPay मध्ये मोठा बदल; App बदललं तरी OTT, SIP आणि EMI चे पेमेंट राहणार सुरू

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री डॉ. हिमंत बिस्वा सरमा यांनी कामरूप जिल्ह्यातील खेत्रीजवळील राष्ट्रीय महामार्ग-२७ वरील अपघातस्थळाला भेट दिली

SCROLL FOR NEXT