Maratha_Kranti_Morcha 
पुणे

पुणे शहरातील मराठा नेत्यांना पोलिसांनी बजावली नोटीस; गुप्तचर विभागाने दिले आदेश

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने राज्यभरातील मराठा तरुण-तरुणींमधून संतप्त भावना व्यक्त होत आहेत. त्यामुळे मराठा आंदोलकांकडून मंत्र्यांच्या भेटी आणि दौऱ्यांच्यावेळी काळे झेंडे दाखवून गाड्या अडविण्याची शक्‍यता असल्याचा इशारा राज्य गुप्तचर विभागाने दिला आहे. त्यामुळे राज्यभरात मंत्र्याच्या दौऱ्याच्या काळात कडक बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच आंदोलन करणाऱ्या शहरातील मराठा नेत्यांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत.

मराठा आंदोलक कार्यकर्ते हे मंत्र्यांच्या भेटी आणि दौऱ्याच्या वेळी काळे झेंडे दाखवून त्यांच्यासमोर निदर्शने करून त्यांच्या ताफ्यास अडथळा करणार असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली असल्याचे पोलिसांना दिलेल्या आदेशात म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर, सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी, उपायुक्त, सहायक आयुक्त आणि पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी त्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील गोपनीय यंत्रणा सतर्क करण्यात येऊन मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात यावे. तसेच मंत्र्यांच्या दौऱ्याच्या वेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पुरेसा बंदोबस्त लावण्यात यावा. योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येऊन कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी, असे आदेश राज्यभरातील पोलिसांना देण्यात आले आहेत.

तर कायदेशीर कारवाईचा इशारा :
मराठा समाजाच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा गुरुवारी (ता.17) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. मोर्चातील प्रमुख कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. शहरात पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलिस आयुक्तांच्या पूर्व परवानगीशिवाय बंदी घातली आहे. या आदेशाचे उल्लंघन करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला आपण आणि आपल्या कार्यकर्त्यांना जबाबदार धरण्यात येईल. तसेच आपल्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असे या नोटिशीत म्हटले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Budget 2026 : भारताच्या संसदीय इतिहासातील सर्वात लांब आणि सर्वात छोटं बजेट भाषणाचा विक्रम कुणाच्या नावावर? वेळ बघून थक्क व्हाल...

Panchang 1 February 2026: आजच्या दिवशी आदित्यहृदय स्तोत्राचे पठण करावे आणि ‘श्री सूर्याय नमः’ या मंत्राचा जप करावा

Budget 2026 : बजेट लीक म्हणजे काय? झाल्यास काय होतं? गोष्ट त्या बजेटची ज्यामुळे अर्थमंत्र्यांना द्यावा लागला राजीनामा...

Latest Marathi News Union Budget 2026 Live : अर्थमंत्री निर्मला सीतारमण वित्त मंत्रालयाकडे रवाना

प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! अजमेर-सोलापूर, पंढरपूर-तिरुपती साप्ताहिक गाड्यांना मुदतवाढ; गर्दी कमी हाेणार..

SCROLL FOR NEXT