Police or RTO will allowed to transport desktop computers  
पुणे

आयटी कंपन्यांना दिलासा; डेस्कटॉप कॉम्प्युटर्सच्या वाहतुकीला पोलिस,आरटीओ देणार NOC

सकाळवृत्तसेवा

पुणे : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील (आयटी) कंपन्यांना त्यांच्या डेस्कटॉप कॉम्प्युटर्सची वाहतूक करायची असेल तर त्यासाठी 'ना हरकत पत्र' प्रमाणपत्र (एनओसी) वाहतूक पोलीस किंवा प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून (आरटीओ) तात्काळ देण्यात येणार आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी कर्मचाऱ्यांसाठी 'वर्क फ्रॉम होम' सुरू केले आहे. त्यामुळे काही कंपन्यांना डेस्कटॉप कॉम्प्युटर्सची वाहतूक करावी लागत आहे. मात्र वाहतूक बंद असल्यामुळे त्यांना 'एनओसी'ची गरज भासत आहे. 

आणखी वाचा - मुंबई कोरोनाच्या तिसऱ्या स्टेजला पोहोचलीय का?
या बाबत विचारणा केल्यावर  'एनओसी' पोलिसांकडूनही देण्यात येईल, अशी माहिती पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी दिली. त्याचप्रमाणे 'आरटीओ'कडूनही 'एनओसी' देण्यात येणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

विमानसेवा बंद होण्यापूर्वीचा मुंबई-दिल्ली तिकिटदर माहिती आहे का?
संबंधित कंपनीला किती डेस्कटॉप कॉम्प्युटर्सची वाहतूक करायची आहे, त्यासाठी कोणती गाडी वापरण्यात येणार आहे, त्या गाडीचा क्रमांक, चालकाचे नाव, त्याच्या मोबाईल क्रमांक तसेच संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक आदींचा असलेले पत्र ई-मेलवर स्कॅन करून पाठवायचे आहे. त्यानंतर तात्काळ वाहतूक पोलीस अथवा आरटीओ कार्यालयाकडून त्यांना ई-मेल द्वारे 'एनओसी' देण्यात येणार असल्याचे डॉ. शिसवे तसेच शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

येथे साधा संपर्क 

  'एनओसी'साठी पोलिसांचा ई-मेल आयडी
 
Punecitypolice.grievance@gmail.com 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

Kaygaon News : शेतकरी पुत्राची गरुड भरारी, धनगरपट्टीच्या शुभम खैरेची नगरपरिषद अधिकारीपदी निवड

Pune Ganeshotsav : दोन वर्षांपासून सहभागी मंडळांनाच यंदा मिरवणुकीत प्रवेश; पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती

SCROLL FOR NEXT