crime 
पुणे

उपसरंपचाला लुटणाऱ्या पोलिसाला एक वर्षांनी अटक 

नितीन बारवकर

शिरूर (पुणे) : लुटमारीच्या उद्देशाने शिरूर तालुक्यातील कर्डे येथील उपसरपंच अंकुश बांदल यांच्यावर वर्षभरापूर्वी झालेल्या हल्ला प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या बडतर्फ पोलिसाला शिरूर पोलिसांनी सोमवारी अटक केली. पोपट मुरलीधर गायकवाड (वय 33, रा. सरपंचवस्ती, ता. दौंड) असे त्याचे नाव असून, शिरूर न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

कर्डे येथील तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य व विद्यमान उपसरपंच अंकुश बांदल यांच्यावर 1 सप्टेंबर 2019 रोजी दोघांनी चाकूने हल्ला केला होता. त्यांच्या गळ्यातील सोन्याचा गोफ व बोटातील अंगठ्या लुटण्याच्या उद्देशाने हा हल्ला झाला होता. स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतल्याने अमोल विश्वास ओहोळ (रा. पेरणे फाटा, ता. हवेली) हा हल्लेखोर दुचाकीवरून पळून गेला; तर समीर ऊर्फ बोतल करवंद्या काळे (रा. सोनगाव, ता. बारामती) याला ग्रामस्थांनी पाठलाग करून पकडले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, बडतर्फ पोलिस पोपट गायकवाड हा प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले. 

गायकवाड हा शिरूर पोलिस ठाण्यात नियुक्तीला होता. अंकुश बांदल हे परिसरात 'गोल्डनमॅन' म्हणून प्रसिद्ध आहेत. ते सोन्याचा गोफ, सोन्याचे ब्रेसलेट व अंगठ्या वापरत असल्याची माहिती गायकवाड याला होती. त्यानेच समीर काळे व अमोल ओहोळ यांच्या मदतीने बांदल यांना लुटण्याचा कट आखला. प्रत्यक्ष गुन्ह्यावेळी स्वतः आला नाही. गायकवाड याचा सहभाग निष्पन्न झाल्यावर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. तत्पूर्वी त्याच्यावर पारनेर येथे तंबाखूचे गोदाम लुटल्याचा गुन्हा दाखल झाला होता. गायकवाड हा शिरूर परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिरूर पोलिसांनी पाळत ठेवून त्याला पकडले, असे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी सांगितले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Crime : बारामती तालुका पोलिसांनी प्रेमी युगुलाला लुटणा-या तिघांना काही तासात केले गजाआड....

Mathura Holika Dahan: जळत्या होळीमध्ये चालतो माणूस; मथुरेतील 'या परंपरेमागचं रहस्य काय? ४५ दिवसही करतो अन्नत्याग

ISRO मध्ये वैज्ञानिक असल्याचे सांगत लग्नाचं आमिष; पुण्यातील महिलेकडून ४२ लाख रुपये उकळले...

IND vs ENG, Semi: भारताने इंग्लंडविरुद्ध कोणती Playing XI खेळवावी? रवी शास्त्री, रिकी पाँटिंग यांचा सल्ला; म्हणाले, अभिषेकला तर...

विकी कौशल चिमुकलीच्या चक्क पडला पाया! स्टेजवरचा तो क्षण पाहून सगळेच झाले भावूक, Viral Video

SCROLL FOR NEXT