पुणे

इच्छामरणापासून आजोबा परावृत्त 

सकाळवृत्तसेवा

पुणे - विविध आजारांमुळे आपल्या कुटुंबीयांची होणारी तारांबळ लक्षात घेऊन, 77 वर्षांच्या आजोबांनी थेट राष्ट्रपतींकडे इच्छामरण मिळावे, यासाठी अर्ज केला. तिथे त्या अर्जाची गांभीर्याने दखल घेऊन, पुणे पोलिसांना या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगितले. हे प्रकरण विश्रामबाग पोलिसांकडे आले. त्यांनी आजोबांना मानवी जीवन व कायद्यातील तरतुदींविषयी माहिती देत, त्यांना इच्छामरणापासून परावृत्त केले. हे पाहून त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर आनंदाची लकेर उमटली ! 

कॅनरा बॅंकेतून सेवानिवृत्त झालेले 77 वर्षांचे ज्येष्ठ नागरिक सदाशिव पेठेत राहतात. त्यांना यापूर्वी हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता, त्याचबरोबर ब्रेन स्ट्रोकही आला होता. याबरोबरच रक्तदाब, मधुमेह, विस्मरण यांसारख्या आजारांचा ते अनेक वर्षांपासून धीराने सामना करत आहेत. पत्नी, दोन मुलगे, सुना असा त्यांचा परिवार आहे; पण त्यांच्या आजारपणाचा परिणाम सगळ्या कुटुंबावर होत असल्याचे त्यांना दिसत होते. म्हणूनच त्यांना इच्छामरण पाहिजे होते. त्यासाठीच त्यांनी थेट राष्ट्रपतींकडे आपल्याला इच्छामरण मिळावे, म्हणून अर्ज केला होता. 

संबंधित अर्जाची राष्ट्रपती कार्यालयाने गांभीर्याने दखल घेऊन, पुणे पोलिसांकडे तो चौकशीसाठी पाठविला. पोलिस प्रशासनाने या प्रकरणाबाबत विश्रामबाग पोलिसांना लक्ष घालण्यास सांगितले. त्यानुसार पोलिस निरीक्षक सुनील कलगुटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सच्चिदानंद कुळकर्णी, पोलिस कर्मचारी शंकर वाघुले यांनी मंगळवारी अर्जदार नागरिकाच्या निवासस्थानी भेट दिली. त्या वेळी त्यांच्यावर डॉक्‍टरांकडून उपचार सुरू असून, आजाराच्या नैराश्‍यातून त्यांनी इच्छामरणाची परवानगी मागितल्याचे त्यांच्या कुटुंबीयांकडून समजले. पोलिसांनी अर्जदार व त्यांच्या कुटुंबीयांच्या भावना समजून घेत, त्यांना धीर दिला. त्यानंतर कुळकर्णी व वाघुले यांनी इच्छामरणासाठी प्रयत्न करणाऱ्या आजोबांना मानवी जीवन व कायद्यातील तरतुदींबाबत माहिती दिली. त्यानंतर त्यांना इच्छामरणाच्या विचारापासून परावृत्त केले. पोलिसांच्या या अनोख्या पद्धतीचे अर्जदाराच्या कुटुंबीयांनीही कौतुक करत त्यांचे आभार मानले. 

आपण 1960 पासून विविध आजारांनी ग्रस्त असून, माझ्यामुळे कुटुंबाला होणारा त्रास पाहवत नसल्यामुळेच इच्छामरणाचा विचार आल्याचे अर्जदारांनी सांगितले. त्यांचे कुटुंबीय उच्चशिक्षित व उच्च मध्यमवर्गीय आहेत. त्यांचा एक मुलगा मुंबईत नोकरीस असून, दुसरा पुण्यात असतो. तो अर्जदार व त्यांच्या पत्नीची काळजी घेतो. अर्जदारांना आम्ही व्यवस्थित समजावून सांगितले असून, त्यानंतर त्यांनी इच्छामरणाचा विचार मनातून काढला आहे. 
- शंकर वाघुले, पोलिस कर्मचारी, विश्रामबाग पोलिस ठाणे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT