Pooja Chavan Death Arun Rathod Confession 100 Number Control room pune police Chitra Wagh 
पुणे

पूजा चव्हाण मृत्यू : दोघं कुठं गेले? घटनेनंतर दिली होती कबुली; चित्रा वाघ यांचा खुलासा

सकाळवृत्तसेवा

पुणे : भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा पूजा चव्हाण आत्महत्या प्रकऱणावरून पोलिसांसह राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. त्यांनी वानवडी पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले. आपण घटनास्थळी जाऊन पाहणी केली तेव्हा फ्लॅट सील होता असं त्यांनी म्हटलं. तिथली परिस्थिती पाहिली, ते पाहून प्रश्न पडतो की, तिने उडी मारली की मारायला लावली याबाबत शंका निर्माण होते. तिच्यासोबत जे घडलं त्याबद्दल अनेक प्रश्न आहेत. गॅलरीत उंच ग्रील आहेत, तिची उंची किती हे माहिती नाही पण आत्महत्या की घातपात याबाबत संशय निर्माण होतो असंही चित्रा वाघ यांनी म्हटलं. 

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पोलिसांची भूमिका हाताची घडी घालून गप्प बसल्यासारखी असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला. वानवडी पोलिसांचा रगेलपणा दिसून आला, त्यांना ही केस दडपण्यासाठीच तिथं बसवण्यात आलं आहे. असे पोलिस अधिकारी मी पाहिले नाहीत. मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांचा सर्वांना अभिमान वाटतो पण त्यालाच काळीमा फासण्याचं काम केलं जात आहे असंही चित्रा वाघ म्हणाल्या. गप्प बसणाऱ्या या पोलिसांचा सूत्रधार वेगळाच आहे. कोणी काय केलं, विचारलं तर आम्ही बघून घेतो असंच त्यांना सांगितलं जात असावं असं चित्रा वाघ म्हणाल्या. 

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण - पुणे पोलिसांची भूमिका संशयास्पद, तपास काढून घ्या 

घटनेला 17 दिवस झाले तरी गुन्हा दाखल झालेला नाही. लेखी आदेश नसल्याचं म्हटलं जात आहे. तु्म्हाला कोणाचा आदेश हवा. कसल्या आदेशाची वाट बघताय असा प्रश्नही चित्रा वाघ यांनी विचारला. तुम्ही सुमोटो तक्रार दाखल करून घेऊ शकता मग तसं करण्यात काय अडचण आहे असंही चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत विचारलं. 

पूजाच्या आत्महत्येवेळी तिच्यासोबत दोघे होते ते कोण? काही दिवसांपासून तिच्यासोबत राहत होते, बोलत होते ते गेले कुठं? एरवी एखादी घटना घडली की आजुबाजुचे लोक पकडून त्यांना ताब्यात देतात. चौकशी करत असतात पण यामध्ये असं काहीच कसं घडलं नाही. त्या दोघांची कस्टडी घेण्याची गरज वाटली नाही का? दोघेही प्रत्यक्षदर्शी होते. त्यांना सोडूनच द्यायचं होतं का? अशा प्रश्नांचा भडिमार चित्रा वाघ यांनी केली. महत्त्वाचे पुरावे होते आणि तेच फरार आहेत. संबंधितांच्या घराला कुलुप आहे. यावर पुणे पोलिस गप्प का बसलेत? त्यांनी ठरवलं आहे का की काहीच करायचं नाही असं चित्रा वाघ यांनी विचारलं.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

अरुण राठोडने कबुली दिल्याचा कॉल 100 नंबरवर आला होता?
दरम्यान, चित्रा वाघ यांनी धक्कादायक खूलासा यांनी केला. त्या म्हणाल्या की, ''ज्यावेळी पूजा बिल्डिंगमधून मुलगी पडली तेव्हा 100 नंबरला कॉल गेला होता. त्यात संपूर्ण माहिती या घटनेची देण्यात आली. घटना घडली तेव्हा पोलिस घटनास्थळी नव्हते. काही सामाजिक कार्यकर्ते तिथे उपस्थित होते. त्यांनी अरुण राठोडकडून माहिती घेतली आणि शंभर नंबरला माहिती दिलेली आहे. ज्यामध्ये अरुण राठोडने कबूल केले आहे की ते फोन संजय राठोडचे होते. मुलगी त्यांच्या संपर्कात होती.एवढचं नाही तर आठ दिवसांपूर्वी यवतमाळमध्ये तिचा गर्भपात करण्यात आला होता. सगळ्याचं मूळ संजय राठोड आहे अशी माहिती 100 नंबरवर दिली होती.''

''ज्या पुण्याच्या कंट्रोल रुम गृहमंत्र्यांनी पहिलाच कॉल घेतला होता त्याच कंट्रोल रुममध्ये हा कॉल गेला होता. त्याच ठिकाणी या घटनेची मिळालेली सगळी माहिती दिली होती. एवढं असूनही कंट्रोल रुमने वानवडी पोलिसांना कळवलं नाही.  तेव्हा अरुण राठोड आणि दुसरा मुलगा पोलिसांच्या आसपास होता तरीही दोघांना अटक का केली नाही? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

पुणे विद्यापीठाने दोन्‍ही सत्रांच्या परीक्षा एकत्र घ्याव्यात; कुलगुरूंकडे मागणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT