school
school  sakal
पुणे

पुणे : दोन मार्चपासून पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू होणार

सकाळ डिजिटल टीम

पुणे : पुण्यात येत्या दोन मार्चपासून शहरातील पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतचे सर्व वर्ग सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती पुण्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे. ते आज पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोना आढावा बैठकीसाठी आले होते. त्यावेळी शहरातील कमी होणारी कोरोनाची रूग्णसंख्या लक्षात घेता शाळा सुरू करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याचे अजित पवार यांनी सांगितले. (Pre-Primary To Class xii Classes Start From March 2nd In Pune)

दरम्यान, शहरातील शाळा सुरु करण्यासाठी आवश्यक त्या सर्व मार्गदर्शक सूचना देण्यात आल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले. या मार्गदर्शक सूचनांचे सर्वांनी पालन करणे आवश्यक असल्याचेही अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच ज्या पालकांना त्यांच्या मुलाला अथवा मुलीला नर्सरी ते सिनिअर केजीसाठी पाठवायचे आहे ते अशा विद्यार्थ्यांना शाळेत पाठवू शकतात असेदेखील ते म्हणाले. ज्या शाळांमध्ये नर्सरी ते सिनिअर केजीचे वर्ग आहेत अशा शाळा सुरू करता येतील असेदेखील अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

पुणे जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्येमध्ये मोठी घट होत असून पुणे जिल्ह्यात कोरोना रूग्णांमध्ये 51 टक्क्यांनी घट झाली असल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे जिल्ह्यातील पूर्व प्राथमिक शाळा 2 मार्चपासून सुरू होणार आहेत. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्यात येणार आहेत. पालकांना वाटलं तर त्यांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवावं असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shrikant Shinde: एक ठाकरे धनुष्य बाणाला तर दुसरे ठाकरे हाताच्या पंजाला करणार मतदान, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: सोलापुरी चादर देत पंतप्रधानांचे सिद्धेश्वरनगरीत स्वागत

Wagholi Accident: नवीन कारचा आनंद काही काळच टिकला! पुण्यात भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

SCROLL FOR NEXT