बुधवार पेठ - अवघ्या सात दिवसांवर दिवाळी आली आहे, त्‍यामुळे इलेक्‍ट्रिकल वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी होत आहे. 
पुणे

भारतीय बनावटीच्या इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंची खरेदी करण्यास प्राधान्य

सकाळवृत्तसेवा

पुणे - दिवाळीसाठी आवश्‍यक असलेल्या इलेक्‍ट्रिकल वस्तूंची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची पावले आता इलेक्‍ट्रिकल दुकानांकडे वळू लागली आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदाच्या दिवाळीत इलेक्‍ट्रिकल वस्तूंच्या विक्रीत ३० ते ४० टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. शिवाय, ग्राहक यंदा भारतीय बनावटीच्या इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंची खरेदी करण्यास प्राधान्य देऊ लागले आहेत. चिनी बनावटीच्या मालाला यंदा कमी मागणी असल्याचे बुधवार पेठेतील पासोड्या विठोबा मंदिराजवळील पुष्पराज इलेक्‍ट्रिकलचे राजाभाऊ भळगट यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

दिवाळीत घरांची सजावट करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विजेच्या दिव्यांच्या माळांना अधिक मागणी आहे. यामध्येही ५० फूट, ४० फूट आणि १०० फूट लांबीच्या माळा खरेदी करण्यासाठी ग्राहक पसंती देत आहेत. 

या सर्व माळा भारतीय बनावटीच्या आहेत. चिनी बनावटीच्या इलेक्‍ट्रिकल माळा फॅन्सी असतात. भारतीय बनावटीच्या माळांची किंमत २० रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत, तर चिनी बनावटीच्या माळांची किंमत ९० रुपयांपासून ८०० रुपयांपर्यंत आहे. मात्र यंदा या फॅन्सी माळांना फारशी मागणी नसल्याचे इलेक्‍ट्रिक वस्तूंच्या विक्रेत्या ऊर्मिला नावंदर यांनी सांगितले. 

दरम्यान, यंदा एलईडी अँड थ्रीडी, होम थिएटर टीव्ही, वॉटर प्युरिफायर, व्हॅक्‍यूम क्‍लीनरसह ॲटोमॅटिक वॉशिंग मशिन, रेफ्रिजरेटर, मोबाईलचे नवीन मॉडेल्स अशा विविध वस्तूंची खरेदी गतवर्षीच्या तुलनेत कमी झाल्याचेही 
सांगण्यात आले.

टीव्हीमध्ये नवीन प्रकार खरेदी करण्याला प्राधान्य दिले जात आहे. त्यादृष्टीने ‘एलईडी अँड थ्रीडी’, ‘स्वाईप अँड शेअर’ यांसारख्या टीव्हीची किंमत २० हजारांपासून पुढे, तर डबल डोअर, बॉटम फ्रीजर ३० हजारांपासून उपलब्ध आहेत. १५ हजार व त्यापेक्षा अधिक किंमत असलेले विविध कंपन्यांचे ॲटोमॅटिक वॉशिंग मशिन आहेत. वॉटर प्युरिफायर, व्हॅक्‍यूम क्‍लीनर, मिक्‍सर ग्राइंडर खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होत आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Protest : एमपीएससी आंदोलनात राज ठाकरेंची एन्ट्री ! विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती सांगत म्हणाले- अध्यक्षांना सरकारही हटवू शकत नाही, कारण...

Beed Voter List: बीडच्या मतदार यादीत चक्क उद्धव ठाकरेंचे नाव! पदवीधर मतदार संघातील उमेदवार दिलीप घुगे यांनी नोंदवला आक्षेप; प्रारूप मतदार यादीत घोळ

Inspirational Story: दोन्ही हात नसतानाही हार मानली नाही; माउली बनली महापालिकेची लिपिक, औक्षणाचा क्षण ठरला भावनिक

Missing Link Accident: मिसिंग लिंकवर काळरात्र! आधी पिकअप पलटी, नंतर बस-ट्रकची जोरदार धडक, ६ ते ७ जण जखमी

Pune MPSC Protest: पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पोलिसांचा दणका; ५१ विद्यार्थ्यांसह २९ खासगी शिकवणी चालकांना नोटिसा

SCROLL FOR NEXT