sule sakal
पुणे

सिंहगडाचा सर्वांगीण विकास आराखडा तयार करा- खा. सुप्रिया सुळे

सिंहगडाचा सर्वांगीण विकास आराखडा तयार करण्याच्या सुचना सुप्रिया सुळे यांनी वन विभागाला दिल्या आहेत

राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला: सिंहगडाचा शिवस्पर्श लाभलेल्या गडावरील इतिहास जाणून घेत, गडाचे पावित्र्य जपत, ऐतिहासिक वास्तुंचे संवर्धन करून निसर्गप्रेमी, गडप्रेमी, देशविदेशातील पर्यटकांना सुविधा उपलब्ध करण्यासाठी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सोमवारी सिंहगडाची पाहणी केली. सर्वांगीण विकास आराखडा करण्याच्या सूचना वन विभागाला दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे मांडला जाणार आहे.

खासदार सुळे यांनी सिंहगडावरील प्रत्येक वास्तुंचा, मंदिर, वाटा, स्मारकांचा इतिहास त्यांनी सिंहगडचे अभ्यासक डॉ.नंदकिशोर मते यांच्याकडून जाणून घेतला. उपवनसंरक्षक राहुल पाटील यांच्याशी ऐतिहासिक वास्तुंचे संवर्धन करून निसर्गप्रेमी, गडप्रेमी, देशविदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी विविध उपाययोजना, सुविधा उपलब्ध करण्यासाठी चर्चा केली.

सुमारे तीन तास त्या गडावर पाहणी केली. माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे, माजी सरपंच विश्वनाथ मुजुमले, माजी सरपंच राजेंद्र डिंबळे खुशाल करंजावणे सोबत उपस्थित होते. विकास आराखड्यातील कामांचे प्रामुख्याने एक, तीन व पाच वर्ष अशी वर्गीकरण करावीत. ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दुर्गप्रेमी आणि स्थानिकांच्या मागण्यांचा याचा एकत्रित विचार करुन, देश विदेशातील पर्यटकांची, दुर्गप्रेमींची पावले सिंहगडावर येण्यासाठी आणि सिंहगडाचा गौरवशाली इतिहास लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहचण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याविषयी प्राथमिक चर्चा करण्यात आली. यावर पुरातत्व, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन विकास मंडळ यांच्या माध्यमातून सर्वांगीण विकास केला जाईल.

गडाची माहिती देणारे गाईड, येथील इतिहास नाटिका स्वरूपात मांडला जावा. यासह स्वच्छ व सुंदर सिंहगडासाठी आणि त्याच्या पर्यटनातून स्थानिकांना रोजगार निर्माण होण्यासाठी खासदार सुळे यांनी पुढाकार घेतला आहे. शिवप्रेमी, सिंहगडप्रेमींच्या मनातील सिंहगडाचा विकास लवकरच पाहायला मिळेल. सिंहगडावर जिल्हा परिषदेची जागा आहे. या ठिकाणी ऐतिहासिक परिसराला साजेसे अशी विश्रामगृहाची वास्तू साकारावी अशी सूचना खासदार सुळे यांनी केली.

कल्याण दरवाजा, तान्हाजी कडा, सिंहगड, राजगड पायवाट, गडाभोवतीची मेटं याविषयी सांगितलेल्या माहितीने सुप्रियाताई भारावल्या. 'मी पुन्हा एकदा खास वेळ काढून येईन आणि सिंहगडाचा सविस्तर इतिहास तुमच्याकडून जाणून घेईन' असा शब्द देत 'सिंहगडाच्या विकासाबाबतच्या विविध उपक्रमासाठी तुमची सहकार्य राहु द्या.' अशी भावना त्यांनी माझ्याकडे व्यक्त केली.- नंदकिशोर मते, सिंहगड अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar News: अहिल्यानगरच्या चार तालुक्यांचा होणार कायापालट; आकांक्षित तालुका योजनेत प्रत्येकी ५ कोटींचा अतिरिक्त निधी

स्टेशनवर गर्दी, ट्रेनमध्ये चढण्याऐवजी वृद्ध थेट इंजिनवरच उभा राहिला; VIDEO VIRAL

दीप-ज्योतीची वाढती जवळीक तर तारिणीच्या जीवाला धोका; ‘झी मराठी’वरील मालिकांमध्ये या आठवड्यात काय घडणार?

Marathi News Live Updates : सर्वोच्च न्यायालयाने अरावली पर्वताबाबत अहवालाची मुदत वाढवण्याची याचिका फेटाळली

निवेदिता सराफ करतात ते इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे काय? किती ते किती वाजेपर्यंत करतात? म्हणाल्या, 'मी कायम...'

SCROLL FOR NEXT