Pretending to be a doctor cheated with the patients relative for Rs 26000 through Google Pay  
पुणे

धक्कादायक! बाळाला महागडं इंजेक्शन द्यायचंय म्हणत नातेवाईकांची फसवणूक

सकाळवृत्तसेवा

पुणे : नवजात बालकांच्या फुफ्फुसाचे कार्य नीट चालत नसल्याने त्यांना महागडे इंजेक्‍शन देण्याची आवश्‍यकता असल्याचे सांगत डॉक्‍टर असल्याचे भासवून एका रुग्णाच्या नातेवाईकाकडून अनोळखी व्यक्तीने गुगल पेद्वारे 26 हजार रुपये लाटल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी 37 वर्षीय व्यक्तीने समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या नातेवाईक महिलेस रास्ता पेठेतील एका रुग्णालयामध्ये प्रसुतीसाठी दाखल केले होते.

Union Budget 2021 : 'मोदी सरकार सुटकेसवालं नाही'; मेड इन इंडिया टॅबवरून आलंय बजेट

काही दिवसांपुर्वी त्या प्रसुती झाल्या. त्यांना जुळी मुले झाल्याने फिर्यादी त्यांना पाहण्यासाठी शुक्रवारी संबंधीत रुग्णालयामध्ये गेले होते. त्यावेळी एका अनोळखी व्यक्तीने फिर्यादीच्या मोबाईलवर संपर्क साधला. "मी संबंधीत हॉस्पीटलमधून डॉक्‍टर बोलत आहे, तुमच्या नातेवाईक महिलेस जुळी मुले झाली असून ती प्रसुतीचे दिवस भरण्यापुर्वीच जन्माला आल्याने त्यांच्या फुफ्फुसाचे कार्य नीट चालत नाही'' असे सांगत त्याने फिर्यादीचा विश्‍वास संपादन केला. त्यानंतर त्याने जुळ्या बाळांना महागडे इंजेक्‍शन देण्याची गरज असल्याचे सांगून ते इंजेक्‍शन आणण्यासाठी 26 हजार रुपये पाठविण्यास सांगितले. त्यानुसार, फिर्यादीने देखील अनोळखी व्यक्तीने सांगितल्यानुसार, त्यांच्या मोबाईलवरुन गुगल पे द्वारे 26 हजार 700 रुपये पाठविले.

Union Budget 2021 : 'मोदी सरकार सुटकेसवालं नाही'; मेड इन इंडिया टॅबवरून आलंय बजेट

या घटनेनंतर फिर्यादींनी संबंधीत व्यक्तीला पुन्हा फोन केला, तसेच त्यांच्या नातेवाईकांशी चर्चा केली. तेव्हा त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या घटनेनंतर त्यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) उल्हास कदम करीत आहे. दरम्यान, याच पद्धतीने ससून रुग्णालयामध्ये दोन ते तीन घटना तर अन्य एका खासगी रुग्णालयामध्ये एक अशा काही घटना घडल्या आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT