Narendra modi narendra modi
पुणे

PM मोदींनी पुण्यात केलं इथेनॉल प्रोजेक्टचे उद्घाटन

शरयू काकडे

पुणे : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारताने इथेनॉल क्षेत्राच्या विकाससाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. इथेनॉलच्या उत्पादन आणि वितरणबाबत E100 पायलेट प्रॉजेक्ट आज पुण्यात सुरू करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे व्हर्च्यअली या प्रकल्पाचे उद्दघाटन केले. ''येत्या काही वर्षांमध्ये भारत इथेनॉलवर आधारित कित्येक प्रकल्प सुरु करेल'' अशी पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बोलताना दिली.केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर आणि केंद्रीय पेट्रोलियम परिवहन मंत्री धर्मेंद्र प्रधान या वेळी उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, ''गेल्या वर्षी ऑईल मार्केटींग कंपन्यांनी 21 हजार करोड रुपयांचे इथेनॉल खरेदी केले. यातील सर्वात मोठा हिस्सा शेतकऱ्यांना मिळाला. विशेषत: उसाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना या जास्त फायदा झाला. मी जेव्हापण शेतकरी बांधवांशी बोलतांना त्यांच्यामधील आत्मविश्वास पाहून बायो फ्युज संबधीत प्रणाली ते सहजपणे स्विकारत आहे असते दिसते.स्वच्छ उर्जाबाबत देशात मोठे अभियान सुरु आहे. त्याचा फायजा कृषी क्षेत्राला मिळणे स्वाभाविक आहे.''

पंतप्रधान म्हणाले, की ''7-8 वर्षांपुर्वी भारतात इथेनॉल बाबत क्वचित र्चचा होत असेल पण आता इथेनॉल भारताच्या 21 व्या दशकात प्राधान्य दिले जात आहे. इथेनॉलमुळे पर्यावरण सोबत शेतकऱ्यांना देखील फायदा होत आहे. आम्ही 2025 मध्ये पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल ब्लेंडिग करण्याचा संकल्प केला आहे. 2014 पर्यंत सरासरी 1-1.5 टक्के इथेनॉल मिश्रित केला जात होता, आज ते 8.5 टक्कयांपर्यंत पोहचला आहे.''

पीएम मोदी म्हणाले की, ''2013-14 मध्ये भारताने 38 कोटी लिटर इथेनॉल खरेदी केले होते. आज हा आकडा 8 पट अधिक असून 320 कोटी लिटरवर पोहचला आहे. ते म्हणाले की वायू प्रदुषण फक्त उद्योंगामुळे होते हे एक खोटं आहे. किंबहूना, परिवहन(Transport), डिझेल जनरेटरचा यांमुळे जास्त प्रदुषण होते. भारत सर्वांगीण दृष्टीकोनाने आपल्या राष्ट्रीय स्वच्छ वायु कार्यक्रमावर काम करत आहे.''

स्वच्छ ऊर्जा(Clean Energy)बाबत बोलताना ते म्हणाले की, आम्ही देशात 37 कोटींपेक्षा जास्त एलईडीबल्ब आणि 23 लाख लाखों ऊर्जा कुशल पंखे उपलब्ध करुन दिले आहेत. याप्रमाणे उज्वला योजनमार्फत गॅस आणि सौभाग्य योजनेमार्फत वीज उपलब्ध करुन प्रदुषण कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे महिला आणि लहान मुलांमधील आरोग्याच्या समस्या सोडविण्यास मदत मिळाली. अर्थव्यवस्था आणि पर्यावरणशास्त्र दोन्ह एकत्र पुढे जाऊ शकतात. भारताने हा मार्ग निवडला आहे. मागील काही वर्षांपासून अर्थव्यवस्था मजबूत करण्यासोबतच आपल्या वन क्षेत्रांमध्ये वाढ झाली आहे. दअलीकडेच देशातील वाघांची संख्या दुप्पट झाली आहे.

मोदीं म्हणाले की, 2014 पर्यंत केवळ 7 हवाईदलाकडे सौर उर्जा होती. आज हा आकडा 50 वर पोहचली आहे. उर्जा क्षेत्रात आम्ही 80 पेक्षा जास्त हवाईदलांवर एलईडी लाईटस् चा वापर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'अटल सेतू' नंतर मुंबईत देशातील सर्वात लांब उड्डाणपूल बांधणार! पण कुठे अन् लांबी किती असणार? वाचा MMRDAचा नवा मास्टरप्लॅन

Women's World Cup: कसली, भारी इंग्रजी बोलते ही पोरगी! भारतीय महिलांनी वर्ल्ड कप जिंकला अन् Viral झाली ही... Video

'अमरेंद्र बाहुबली' री-रिलीज असूनही बाहुबली: द एपिकची रेकॉर्डब्रेक कमाई! प्रभासचा दबदबा कायम!

Mahur News : अचानक आलेल्या पुरातुन पर्यटक बालबाल बचावले....; नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील घटना

Stock Market Closing : शेअर बाजाराचा सपाट पातळीवर व्यवहार! पण Lenskart IPO ची मोठी मागणी! कोणते शेअर्स चमकले ?

SCROLL FOR NEXT