jail 
पुणे

येरवडयातील तात्पुरत्या कारागृहातून पळालेल्या कैद्याला अखेर अटक

सकाळ वृत्तसेवा

पुणे, ता. 14 : स्वच्छतागृहात जाण्याचा बहाणा करुन बहाण्याने येरवडा येथील तात्पुरत्या कारागृहातून पळालेल्या कैद्याला अखेर शिरुर पोलिसांनी बेडया ठोकल्या. रविवारी रात्री साडे आठ वाजता कैद्याने धूम ठोकली होती.त्याला शिरुर पोलिसांनी ताब्यात घेतलं.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, अनिल विठ्ठल वेताळ (रा. गणेशनगर, डिग्रजवाडी फाटा, कोरेगाव भीमा) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई विशाल अरुण जाधव (वय ३५) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेताळ यास चोरी केल्याच्या प्रकरणात शिरुर येथील न्यायालयाने २३ जूनला शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्याला येरवड्यातील तात्पुरत्या कारागृहात दाखल करण्यात आले होते. 

दरम्यान, रविवारी रात्री साडेआठ वाजता वेताळ याने कर्तव्यावरील पोलिसाला स्वच्छतागृहात् जायचे आहे, असे त्याने सांगितले. त्यानुसार कर्मचारी त्याला घेऊन बाथरुमपर्यंत गेला. त्यानंतर अनिलने बाथरुमच्या आतील दरवाजाची कडी तोडून गॅलरीतून पलायन केले होते. त्यानंतर तो शिरुर येथे गेला होता, त्याची खबर मिळताच पोलिसांनी अनिल अटक करुन येरवडा पोलिसांच्या ताब्यात दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Grand Tour : पुणे ग्रॅंड स्पर्धेत लाखमोलाच्या सायकलींची साथ; अत्याधुनिक आणि लाखो रुपयांच्या सायकलींचीचुरस

US Iran Conflict: जग युद्धाच्या उंबरठ्यावर! अमेरिकेची महाविनाशकारी युद्धनौका इराणसमोर, क्षणात युद्ध पेटण्याची भीती

Municipal Mayor Election : पुणे, मुंबईत ‘महिलाराज’! महापौरपदाची सोडत जाहीर; ठाणे अनुसूचित जातीसाठी राखीव

IndiGo Bomb Threat : दिल्ली-पुणे विमान बॉम्बने उडवण्याची धमकी, टॉयलेटमधील चिठ्ठीमुळे प्रवाशांत घबराट, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : प्रजासत्ताकदिनी शाळांना सुटी नाही; शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी जारी केला आदेश

SCROLL FOR NEXT