IAS_Sourabh_Rao 
पुणे

वाढत्या रुग्णसंख्येमुळे खासगी रुग्णालयांना सौरभ राव यांच्या विशेष सूचना!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोना रुग्णांना बेड आणि वैद्यकीय सेवा वेळेत मिळवून देण्यासाठी खासगी रुग्णालयांनी उपलब्ध बेडसह अन्य आवश्यक माहिती डॅशबोर्डवर अचूक नोंदवावी, अशा सूचना विभागीय आयुक्त कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी सौरभ राव यांनी दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयात राव यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील प्रमुख रुग्णालयांचे व्यवस्थापक, संचालक व डॉक्टरांसोबत बैठक घेण्यात आली. 

राव म्हणाले, कोरोनाच्या वाढत्या रुग्णांवर वेळेत उपचार होण्यासाठी खासगी रुग्णालयांनी आणखी बेड उपलब्ध करुन द्यावेत. दोन इमारती असणाऱ्या रुग्णालयांनी एक इमारत 'कोविड हॉस्पिटल' म्हणून घोषित करुन उपचार सुरू करावेत. त्याचबरोबर लक्षणे नसणाऱ्या रुग्णांचे समुपदेशन करुन गृह विलगीकरणावर भर द्यावा. 

या वेळी भारती हॉस्पिटल, जहांगीर, रुबी, केईएम, ईनलॅक्स, नोबेल, सह्याद्री, इनामदार, दीनानाथ मंगेशकर, पूना हॉस्पिटल, देवयानी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आदी रुग्णालयांच्या डॉक्टरांनी डॅशबोर्डचे सादरीकरण केले. याबरोबरच रुग्णालयांना येणाऱ्या अडचणी मांडल्या, तसेच प्रशासनाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

बैठकीला पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्त पवनीत कौर, सहायक धर्मादाय आयुक्त नवनाथ जगताप, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, ससूनचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, तसेच, खासगी रुग्णालयांचे व्यवस्थापक, प्रमुख डॉक्टर उपस्थित होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खासगी रुग्णालय व्यवस्थापनासाठी पाच अधिकारी :
खासगी रुग्णालय आणि प्रशासनातील समन्वयासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या पाच समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रुग्णालयांतील बेडची उपलब्धता, आकारण्यात येणारे शुल्क शासकीय नियमानुसार होत असल्याबाबत माहिती घेणे आणि अन्य वैद्यकीय सुविधांवर नियंत्रण ठेवण्याचे काम हे अधिकारी करतील.

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Crime: वाईत उडाली खळबळ! 'भरदिवसा १५ लाखांची चोरी'; गंगापुरीत दोन सदनिका फोडून १९ तोळे सोन्याचे दागिने पळविले

Indore Cleanest City: इंदूर सलग आठव्यांदा ठरले स्वच्छ शहर;गुजरातमधील सुरत दुसऱ्या, तर नवी मुंबई तिसऱ्या स्थानी

Weekend Breakfast Recipe: वीकेंडला सकाळी चहासोबत बनवा कुरकुरीत पोहा बाईट्स, सोपी रेसिपी

Marathwada Rain: दीर्घ प्रतीक्षेनंतर मराठवाड्यात कोसळल्या धारा; जालना, परभणी, लातूर, बीड जिल्ह्यांत पाऊस,३२ मंडळांत अतिवृष्टी

आनंदाची बातमी! 'कागल- सातारा महामार्ग वर्षात पूर्ण हाेणार'; बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, अधिवेशनात ग्वाही

SCROLL FOR NEXT