private hospitals will be taken over if number of corona patients increases in Pune.jpg 
पुणे

Corona Virus : पुण्यातील खासगी रुग्णालये ताब्यात घेण्याची तयारी

सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी शहरातील सार्वजनिक रुग्णालयांची क्षमता कमी पडत असेल तर, खासगी रुग्णालये ताब्यात घेण्यात येतील, असे प्रतिपादन कोरोनाची पाहणी करण्यासाठी शहरात आलेल्या पथकाने मंगळवारी स्पष्ट केले.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
कोरोनाचा पुण्यात उद्रेक झाल्यामुळे केंद्र सरकारने केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव संजय मल्होत्रा यांच्या नेृतृत्वाखालील पाच सदस्यांचे पथक पुण्यात पाहणीसाठी पाठविले आहे. शहरातील परिस्थितीचा आढावा घेतल्यावर बैठक झाली.त्यात महापौर मुरलीधर मोहोळ यांनी, कोरोनाच्या सुमारे 700 रुग्णांवर महापालिका आणि ससून रुग्णालय उपचार करीत आहे. परंतु, कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली तर, शहरात विपरित परिस्थिती निर्माण होणार असल्याचे स्पष्ट केले.

गुड न्यूज! भारतात कोरोनाची पहिली चाचणी यशस्वी...

सध्या सिंबायोसिस, भारती विद्यापीठ या खासगी रुग्णालयांनी महापालिकेला सहकार्य केले आहे. परंतु, शहरातील काही नामांकित आणि मोठ्या रुग्णक्षमतेची रुग्णालये महापालिकेला अद्याप पुरेसे सहकार्य करीत नसल्याचे मोहोळ यांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर मल्होत्रा यांनी, प्रसंगी आपत्ती कायद्याप्रमाणे शहरातील खासगी रुग्णालये ताब्यात घेता येतील, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच महापालिका त्यांना ईएसआयच्या दरानुसार पैसे देण्यास तयार आहे, असेही मोहोळ यांनी स्पष्ट केले.

Coronavirus : नायडू, ससूनला 10 स्वॅब टेस्टींग बूथ प्रदान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

राजकुमार रावचं झालं प्रमोशन! अभिनेता होणार बाबा; पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज

SCROLL FOR NEXT