Property-Card 
पुणे

घरबसल्या मिळणार आता प्रॉपर्टी कार्ड

सकाळवृत्तसेवा

पुणे - सातबारा उताऱ्यापाठोपाठ आता डिजिटल स्वाक्षरी असलेले प्रॉपर्टी कार्डसुद्धा भूमिअभिलेख विभागाने ऑनलाइन उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे नागरिकांना आता घरबसल्या प्रॉपर्टी कार्ड पाहता येणार आहे. हे कार्ड सर्व शासकीय कामांसाठी ग्राह्य धरले जाणार आहे.

जिल्ह्यातील पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांसह गावठाण मिळून एकूण दोन लाख ३२ हजार प्रॉपर्टी कार्ड आहेत. यातील सुमारे दोन लाख प्रॉपर्टी कार्ड ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. भूमि अभिलेख विभागाकडून नागरिकांना विविध प्रकारच्या सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येत आहे. केंद्र सरकारने ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’चे धोरण अवलंबिले आहे. त्या अंतर्गत अभिलेखांचे संगणकीकरण, फेरफार प्रकियेत सुटसुटीतपणा आणि किमान मानवी हस्तक्षेप या तत्त्वांचा स्वीकार करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर डिजिटल स्वाक्षरी असलेले प्रॉपर्टी कार्ड नागरिकांना ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबविला जात आहे. यामुळे विभागाचे कामकाज गतिमान आणि पारदर्शक होणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

डिजिटल स्वाक्षरी असलेले ऑनलाइन प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने यापूर्वीच दर निश्‍चित करून दिले आहेत. त्यानुसार शहरी भागातील मिळकतीचे प्रॉपर्टी कार्डचे दर हे १३५ रुपये राहणार आहे. नगरपालिका हद्दीत ९०, तर ग्रामीण भागातील मिळकतीच्या प्रॉपर्टी कार्डाचे दर हे ४५ रुपये असणार आहेत.

या संकेतस्थळावर मिळणार प्रॉपर्टी कार्ड
www.digitalsatabara.mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. प्रॉपर्टी कार्डसाठी ऑनलाइन पैसे भरण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.

हे होणार फायदे

  • घरबसल्या प्रॉपर्टी ऑनलाइन मिळणार
  • नागरिकांना भूमापन कार्यालयात जाण्याची गरज नाही
  • वेळेची, पैशांची होणार बचत
  • प्रॉपर्टी कार्डसाठी ऑनलाइन पैसे भरण्याची सुविधा
  • बनावट प्रॉपर्टी कार्डला आळा बसणार, फसवणूक टळणार

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Latest Maharashtra News Updates : ..तर हे स्पष्ट होईल, की महाराष्ट्राविषयीचा द्वेष हाच भाजपचा खरा चेहरा आहे! - उद्धव ठाकरे

Pune Crime: आषाढी वारीत मुलीवर अत्याचारप्रकरणी मोठी अपडेट, नराधमांना अटक; आरोपी निघाले...

Murud Crime : पोलिसांच्या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाल्याचा संशय; नातेवाईकांनी रस्ता अडवला

Government Recruitment 2025: राज्यात मेगाभरती! मुख्यमंत्र्यांची घोषणा; भरती प्रक्रियेचे नियम बदलणार

SCROLL FOR NEXT