पुणे

प्रवास भाड्यात दरवाढीचा प्रस्ताव फेटाळला 

सकाळवृत्तसेवा

पुणे : इंधनाच्या वाढत्या दरवाढीमुळे आर्थिक बोजा पडतो म्हणून प्रशासनाने प्रती टप्पा सुचविलेली दोन रुपयांची दरवाढ पीएमपीच्या संचालक मंडळाने एकमताने फेटाळून शनिवारी प्रवाशांना दिलासा दिला. उत्पन्नाचे पर्यायी स्त्रोत निर्माण करून पीएमपीवरील आर्थिक ताण सुसह्य करण्यात येईल, अशी ग्वाही महापौर मुक्ता टिळक आणि पीएमपीचे संचालक सिद्धार्थ शिरोळे यांनी पत्रकार परिषदेत शनिवारी दिली. 

पीएमपीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती महापौर टिळक आणि शिरोळे यांनी या वेळी दिली. महापौर म्हणाल्या, ""इंधन दरवाढीमुळे पीएमपीवरील आर्थिक ताण वाढत आहे. म्हणून प्रशासनाने दरवाढ सुचविली होती. परंतु, दरवाढीऐवजी उत्पन्नाचे पर्यायी स्त्रोत निर्माण करण्यावर प्रशासनाने या पूर्वी भर दिलेला नव्हता, हे संचालक मंडळाने त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे संचालक मंडळाने एकमताने दरवाढीचा प्रस्ताव फेटाळला.'' 

नवे आर्थिक स्त्रोत निर्माण करण्यासाठी जाहिरातींचे विविध प्रकार, वेगवेगळ्या प्रकारच्या पासचा खप वाढेल, यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे, असेही महापौरांनी सांगितले. तसेच दैनंदिन खर्चात कपात करता आली तर, त्यातूनही बचत शक्‍य आहे. त्यामुळे प्रवाशांवार नवा बोजा लादण्याची गरज नाही, असेही मत त्यांनी व्यक्त केले. 

चिल्लरचा प्रश्‍न पाच दिवसांत सोडविणार 

पीएमपी प्रशासनाकडे सध्या सुमारे 30 लाख रुपयांची चिल्लर साठली आहे. पीएमपीचे खाते असलेल्या राष्ट्रीयीकृत बॅंकेने चिल्लर स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या पेचप्रसंगातून मार्ग काढण्यासाठी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाशी (आरबीआय) संपर्क साधण्यात आला आहे, असेही शिरोळे यांनी सांगितले. त्यांनी दिलेल्या सूचनांनुसार बॅंकांशी या बाबत चर्चा सुरू आहे. त्यातून पाच दिवसांत हा प्रश्‍न सुटेल, असा दावा त्यांनी केला. दरम्यान, पीएमपी प्रशासनाने सुरू केलेल्या "मी कार्ड'चा वापर परिणामकारक झाला तर, चिल्लरचा प्रश्‍न उद्‌भवणार नाही, असेही त्यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT