Amol_Kolhe 
पुणे

राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्राची कार्यवाही सुरू करा; खासदार कोल्हेंच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

सकाळ वृत्तसेवा

मंचर (पुणे) : राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र शिरुर लोकसभा मतदार संघात उभारण्यासाठी केंद्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे या केंद्रासाठीचा डीपीआर तयार करुन प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्याची प्रक्रिया तत्काळ सुरू करण्यासाठी कार्यवाही सुरू करावी, अशी सूचना खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत केली. 

भीमाशंकरचे अभयारण्य आणि खेड, जुन्नरच्या आदिवासी क्षेत्रात गुळवेल, हिरडा यासह असंख्य वनौषधी आहेत. या भागात वनौषधी व लागवडीसाठी बराच वाव आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांना रोजगार मिळू शकेल. या भागात राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र उभारण्याची मागणी खासदार डॉ. कोल्हे यांनी केंद्रीय आयुष मंत्रालयाकडे केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत नाईक यांनी प्रस्ताव तयार करुन मंजुरीसाठी सादर करण्याची सूचना केली होती. त्यानुसार सदर राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्राचा डीपीआर तयार करणे, जागा निश्चित करुन प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करणे आदी कामांसाठी सल्लागार संस्थेची नेमणूक करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने डॉ. कोल्हे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित केली होती. 

या बैठकीत पुणे विद्यापीठाच्या बॉटनी विभागाचे प्रमुख व आयुष उपसंचालक . दिगंबर मोकाट, ए. बी. आढे, एकात्मिक आदिवासी प्रकल्पाचे नियोजन अधिकारी स्वप्निल कोरडे, संकेत तोंडारे, शुभांगी फुले (तहसीलदार सर्वसाधारण शाखा), जिल्हा नियोजन समिती सदस्य अमोल हरपळे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्राचा डीपीआर आणि प्रस्ताव तयार करण्यासाठी सल्लागार संस्थेची नेमणूक करणे आदी बाबींसाठी लवकरच कार्यवाही करण्यात येईल. त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्याकरिता सर्व संबंधितांची लवकरच बैठक आयोजित केली जाईल, असे आश्वासन दिले. 

या संदर्भात डॉ. कोल्हे म्हणाले, राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र आपल्या भागात होणे ही मोठी बाब असून त्याचा मोठा लाभ आदिवासी समाजाला तर होईलच परंतु आयुर्वेदाच्या संशोधनासाठी त्याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. त्यामुळे आपण प्रत्येक स्तरावर याचा पाठपुरावा करणार आहोत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : काळजी घ्या, सगळं ठरल्याप्रमाणं होईल! जरांगेंना भेटताच विखे पाटलांनी दिली सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती

Marathwada Rain Forecast : मराठवाड्यात आजपासून वादळासह पावसाची शक्यता, तापमानात एक ते दोन अंशाने वाढ

Numerology: 'या' मूलांकाच्या मुली सासरी घेऊन येतात अखंड समृद्धी! पाहा कोणत्या मूलांकाची मुलगी सासरसाठी ठरते लक्ष्मी?

Marathi News Live Updates : आशियाई क्रीडा स्पर्धेत एलावेनिल वलारिवानने जिंकलं रौप्य पदक

Raju Shetti Sugarcane FRP : 'स्वाभिमानी'ची नेहमीची भूमिका बदलली! राजू शेट्टी पहिल्यांदाच समतोल भूमिका घेत कारखानदारांच्या भेटीला; नेमक्या मागण्या काय?

SCROLL FOR NEXT