Protest against CAA and NRC in Pune At Goodluck Chowk 
पुणे

Video : 'आम्ही सारे एक'; पुण्याच्या गुडलक चौकात जोरदार निदर्शने

महेश जगताप

स्वारगेट (पुणे) : एनआरसीच्या विरोधात गुडलक चौकात मोठ्या संख्येने विध्यार्थी व युवक क्रांती दलाच्या वतीने मोठ्या प्रमाणात एकत्रित येत  निदर्शने करण्यात आली. यावेळी NRC च्या विरोधात घोषणा देण्यात आल्या व आम्ही सर्व भारतीय एक आहोत व त्यामध्ये जाती व धर्माच्या आधारे आम्ही केलेला भेदभाव सहन करणार नाही असे विद्यार्थी प्रतिनिधी बोलताना त्यांनी व्यक्त केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या सरकारला हटवा आणि देश वाचवा अश्या घोषणाही यावेळी मोठ्या प्रमाणात देण्यात आल्या. यावेळी पुणे शहरातून मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते हजर होते.



एनआरसी कायदा रद्द झाला पाहिजे हा देश कोणाच्या मालकीचा नाही. हा देश स्वतंत्र होण्यासाठी अनेकांनी घाम गाळला आहे. यामध्ये मुस्लिम, शीख, ईसाई, ख्रिश्चन न हिंदू, बौद्ध अश्या अनेक धर्मियांनी आपले बलिदान दिले आहे. त्यामुळे या देशावर एका कोणत्या धर्माचे प्राबल्य होऊ शकत नाही हे भाजप ने समजून घेतले पाहिजे. त्यामुळे हा कायदा पाठीमागे घेऊन त्यांनी समजूतदारपणा दाखवला पाहिजे व या कायद्याच्या विरोधात पुरोगामी सर्व पक्षांनी आपले मतभेद बाजूला ठेवून एकत्रित आले पाहिजे व संघटित लढा दिला पाहिजे, असे मत अपूर्वा नायडू विद्यार्थींनीने यावेळी व्यक्त केले.

तर माझा पुतळा जाळा, पण... : पंतप्रधान मोदी

भारतीय संविधानातील कलम 14 कायद्यापुढे सर्व व्यक्ती समान असे सांगतात नागरिकत्व दुरुस्ती कायदा संविधानातील या कलमाच उल्लंघन करतं. त्याप्रकारे हा कायदा संविधानाच्या मूलभूत रचनेविरुद्ध आहे. मोदी सरकार स्वतःचं आर्थिक अपयश झाकण्यासाठी CAA, NRCच्या माध्यमातून भारतीय नागरिकांची दिशाभूल करत आहे. सरकारचा हा कुटील डाव हाणून पाडण्यासाठी आज लाखो तरुण रस्त्यावर उतरले आहेत.

केजीएफचा दुसरा भाग लवकरच पडद्यावर; संजय दत्त महत्वाच्या भूमिकेत

45 वर्षातील सर्वात जास्त बेरोजगारी देशात निर्माण झाली आहे. आर्थिक मंदीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. एकीकडे हे सरकार 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेची स्वप्न दाखवतं आणि दुसरीकडे देशाचा जीडीपी घसरत चालला आहे, हे सत्य असल्याचे मयूर डुमणे नावाच्या विद्यार्थ्यांने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT