Protest Against in January 29 against NRC said Waman Meshram.jpg 
पुणे

NRC विरोधात 29 जानेवारीला बंद : वामन मेश्राम

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरेगाव भीमा येथे उद्या (ता. 1) राज्यस्तरीय अभिवादन सभेचे आयोजन केले आहे. या वेळी न्यायालयात आंदोलकांच्या बाजूने लढणाऱ्या वकिलांचा सत्कार केला जाणार आहे. तसेच, नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत (एनआरसी) चर्चा करून, त्याला विरोध करण्याबाबतची पुढील रणनीती ठरविली जाणार आहे. या कायद्याला भारत मुक्ती मोर्चाचा विरोध आहे. याच्या निषेधार्थ 29 जानेवारीला बंद आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती बामसेफ व भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. 

कोरेगाव भीमा येथे दोन वर्षांपूर्वी झालेल्या दंगलीबाबत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करून त्यांची चौकशी करण्याची मागणी मेश्राम यांनी केली. या दंगलीमागे मिलिंद एकबोटे आणि मनोहर भिडे यांचा हात असल्याचा आरोप करून याबाबतचे सर्व पुरावे उच्च न्यायालय आणि चौकशी आयोगासमोर सादर केल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय प्रभारी कुमार काळे, विठ्ठल सातव, सचिन बनसोडे, किशोर तुपारे, ऍड. राहुल मखरे, रेखा कापसे आदी उपस्थित होते. 

कोरेगाव भीमा : प्रकाश आंबेडकर यांच्याकडून मानवंदना

कांबळे, बडोलेच्या मंत्रिपदावर संक्रांत 
कोरेगावमधील दंगलीबाबत तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे हे आंदोलकांच्या बाजूने होते. त्यांची ही भूमिका देवेंद्र फडणवीस यांना मान्य नव्हती. त्यामुळेच फडणवीस यांनी या दोन्ही मंत्र्यांना कालांतराने मंत्रिमंडळातून काढून टाकल्याचा आरोप वामन मेश्राम यांनी केला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Forecast : परतीचा मान्सून बरसणार! पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा अन् विदर्भात पावसाचा इशारा, आज २४ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Railway : हडपसर-हरंगूळ, नांदेड एक्स्प्रेसचे तीन डबे वाढणार

Beetroot Poriyal: खवलेले खोबरे अन् खमंग फोडणी; १० मिनिटांत बनवा दाक्षिणात्य पद्धतीची बीटरूट पोरियल! पाहा सोपी रेसिपी...

आजचे राशिभविष्य - 22 सप्टेंबर 2026

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT