nasrapur sakal
पुणे

नसरापूर मधील मुख्य रस्त्याकडे सार्वजनीक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

महिना झाला खडी पडली परंतु काम नाही , दुचाकींचे होतायत अपघात

सकाळ वृत्तसेवा

नसरापूर : नसरापूर येथील चेलाडी ते गाव या मुख्य रस्त्याची दुरावस्था झाली असुन रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आणलेली खडी महिना झाला तरी रस्त्याच्या बाजुलाच पडुन असुन खड्डयात पडुन दुचाकी चालकांचे अपघात होत आहेत सार्वजनीक बांधकाम विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे.

नसरापूरच्या या मुख्य रस्त्यावर चार ठिकाणी रस्त्याची खडी पुर्ण उखडुन गेली असुन मोठे खड्डे पडले आहे त काही महिन्यापुर्वी पावसाळ्या नंतर सार्वजनीक बांधकाम विभागाने खड्डे बुजवताना या चार ठिकाणी सिमेंटचा रस्ता करायचा असल्याचे सांगुन येथील खड्डे बुजवले नाहीत त्या नंतर काही दिवसांनी या खड्ड्यांजवळ कामासाठी खडी येऊन पडली मात्र आता महिना ते दिड महिना झाला तरी काम सुरु होईना त्या मध्येच चेलाडी वरुन येताना विज वितरण कंपनीच्या कार्यालया समोर तुंबलेल्या गटाराचे पाणी वाहुन रस्त्यामध्ये आडवा मोठा खड्डा पडला आहे त्याकडे देखिल सार्वजनीक बांधकाम विभागाचे अभियंता दुर्लक्ष करत असल्याने या ठिकाणी अनेक दुचाकी चालकांचे अपघात झाले आहेत.

सार्वजनीक बांधकाम विभाग पावसाळ्यात रस्त्याच्या दोन्ही बाजुला गटारे काढुन पाणी वाहण्याची व्यवस्था करते मात्र गेले अऩेक वर्ष अशी गटारे न काढल्याने पाणी रस्त्यावर वाहुन खड्डे पडत आहेत विशेष म्हणजे याच रस्त्यावरुन सार्वजनीक बांधकाम विभागाचे अभियंता वेल्हे कडे जातात व येतात तरी देखिल या रस्त्याची दुरावस्थेकडे दुर्लक्ष करत असल्याने नसरापूर येथील नागरीकांनी तिव्र नाराजी व्यक्त केली आहे.

नसरापूर येथील व्यापारी रविंद्र शेडगे यांनी या बाबत प्रतिक्रीया देताना सांगितले कि, सार्वजनीक बांधकाम विभागाच्या गलथान कारभाराचा हा नमुना आहे गेले पावसाळ्या पासुन हे खड्डे जसेच्या तसेच आहेत त्यामधुन खडी उडते,धुळ उडते आहे रस्त्याच्या बाजुचे नागरीक खुप त्रस्त झाले आहेत. माजी सरपंच प्रकाश चाळेकर यांनी प्रतिक्रीया देताना सांगितले कि,रस्त्याच्या कामासाठी खडी येऊन पडली आहे तरी कोणत्या मुहुर्ताची वाट पाहीली जात आहे कळत नाही नसरापूर येथील रस्त्या बाबत अधिकारयांकडुन कायम अशी भुमिका घेतली जाते रस्त्याच्या कामासाठी नागरीकांना रस्त्यावर उतरावे लागणार आहे काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Mumbai News: नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, वेसावे ते भाईंदर कोस्टल रोडच्या कामाला वेग

Latest Maharashtra News Live Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT