Flood_Damage 
पुणे

अतिवृष्टीनं पुणे विभागातील साडेपाच हजार हेक्‍टर जमीन खरडली; नुकसानीचे पंचनामे पूर्ण

सकाळ वृत्तसेवा

पुणे : अतिवृष्टीमुळे पुणे विभागात झालेल्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. विभागातील पुण्यासह पाच जिल्ह्यांमध्ये पाच लाख 39 हजार हेक्‍टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले आहे. साडेपाच हजार हेक्‍टर जमीन खरडली गेली आहे. तसेच, घराची पडझड आणि पुरात वाहून गेल्यामुळे 49 व्यक्‍ती आणि साडेसात हजारांहून अधिक पशु-पक्ष्यांचा बळी गेल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे. 

पुणे विभागात जून ते ऑक्‍टोबर या कालावधीत पुणे विभागात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे जीवित आणि वित्त हानी झाली. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. त्यानुसार पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पाच लाख 39 हजार हेक्‍टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले. त्यात सर्वाधिक नुकसान सोलापूर जिल्ह्यात तीन लाख 95 हजार 468 हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्याखालोखाल पुणे, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात पिकांचे नुकसान झाले आहे. 
पुणे विभागात सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक 22 व्यक्‍तींचा बळी गेला आहे. त्यात पुणे जिल्ह्यात 13, सांगली 10, सातारा जिल्ह्यात चार जणांचा बळी गेला आहे. 

पुणे विभागात कोल्हापूर वगळता अन्य चार जिल्ह्यांमध्ये दोन हजार 623 पशु आणि पाच हजार 42 पक्षांचा बळी गेला आहे. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील जनावरांचे 562 गोठे नष्ट झाले आहेत. तसेच, 14 हजार 25 घरे आणि 625 झोपड्यांची पडझड झाली आहे. या संदर्भात बाधितांना नुकसानभरपाई देण्यासाठी राज्य सरकारकडे निधीची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्‍त कार्यालयाकडून देण्यात आली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 18 लाँच होताच जुन्या iPhoneच्या किमती वाढल्या! iPhone 17, iphone 17 pro सह कोणते मॉडेल महागले?

क्रिकेटच्या कारभारात मोठा बदल होणार? सर्वोच्च न्यायालयाने BCCIसमोर उपस्थित केला ‘हा’ सवाल; १२ वर्षांपासून प्रलंबित प्रकरण पुन्हा चर्चेत

IPS Mohita Sharma: कोण आहेत आयपीएस मोहिता शर्मा? KBCमध्ये १ कोटी रुपयांचा जॅकपॉट जिंकून, पाचव्या प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण

Asian Games 2026 पूर्वी टीम इंडियाला धक्का! स्टार खेळाडू संघातून बाहेर, बदली खेळाडूची झाली घोषणा

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात पुण्याच्या मध्यवर्ती भागातील बारा प्रमुख रस्त्यांवर जड वाहनांना बंदी

SCROLL FOR NEXT