vadaki.jpg 
पुणे

पुणे : वडकीत फळझाडे मुळासह उखडून पडल्याने बळिराजा...

प्रभाकर गायकवाड

उरुळी देवाची (पुणे) : तीन जून रोजी झालेल्या पाऊस व वादळी वार्‍यामुळे वडकी परीसरात झालेल्या शेतकर्‍यांच्या पीक व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्याची पाहणी कृषी व महसूल विभागाच्या वतीने करुन पंचनामे करण्यात आले. 
कोकण किनार पट्टीवर धडकलेल्या चक्रीवादळाचा तडाखा पुण्यासह अनेक ठिकाणी बसल्यामुळे शेतकरी व स्थानिक ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामध्ये शहरालगत असलेल्या वडकी परिसरातील फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

कोरोनामुळे बाजारपेठ उपलब्ध नसल्याने अगोदरच खाईत गेलेल्या शेतकर्‍यांवर पाऊस व वादळी वार्‍यामुळे अनेक फळझाडे मुळासह उखडून पडल्याने फळबागांचे अस्तित्वच धोक्यात आले. उन्हाळ्यात अत्यंत कष्टाने व जीवापाड प्रेम करून जपलेल्या पेरू, सीताफळ, अंजीर, लिंबू या फळबागा वादळाने जमिनदोस्त झाल्याने या अस्मानी संकटातून शेतकर्‍यांना वाचविण्यासाठी शेतकर्‍यांनी शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली होती. 

त्यानुसार कृषी विभाग, महसूल विभाग, जिल्हा परिषद व ग्रामपंचायत वडकी यांच्या वतीने वडकी परीसरातील बागांची पाहणी तालुका कृषी अधिकारी जाधव पी. एस. महसूल अधिकारी नामदेव शिंदे, मधुकर बावळे, जि. प. कर्मचारी अंकुश जाधव, वडकीच्या सरपंच ताराबाई मोडक, सचिन मोडक, मच्छिंद्र गायकवाड, जनसुराज्य फाऊंडेशनचे अध्यक्ष लहु पारवे, अंकुश गायकवाड, नुकसानग्रस्त शेतकरी मधुकर गायकवाड, गोरख गायकवाड आदीच्या उपस्थितीत पंचनामे केले. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना त्वरित आर्थिक मदत करण्याची मागणी ग्रामस्थ व शेतकरी यांनी यावेळी शासकीय अधिकार्‍यांकडे केली आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT