Vaccination Sakal
पुणे

Pune : ग्रामीण भागात लसीकरण वाढते

राज्यात ४६ टक्के महिला, ५४ टक्के पुरूष सहभागी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यात कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या महिलांचे प्रमाण ४६ टक्के असून, ५४ टक्के पुरुषांनी लसीकरणात सहभाग नोंदविला आहे. तसेच, कामानिमित्त सातत्याने घराबाहेर असणाऱ्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी सर्वाधिक लस घेतली आहे. यात शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात लसीकरणाचे प्रमाण सातत्याने वाढत आहे, असे निरीक्षण सार्वजनिक आरोग्य खात्याने नोंदविले.

देशात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले. सुरुवातीला आरोग्य सेवक, त्यानंतर पोलिस, प्रशासकीय अधिकारी यांना लसीकरणात प्राधान्य दिले. पाठोपाठ ज्येष्ठ नागरिकांना लस मिळाली. त्यानंतर आता १८ पेक्षा जास्त वर्षांच्या सर्वांसाठी लस खुली करण्यात आली. सरकारी रुग्णालयांबरोबरच खासगी संस्थांनाही लसीकरणाला परवानगी दिली, त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढला. देशात दोन्ही डोस म्हणजे पूर्ण लसीकरण झालेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. राज्यात दोन्ही डोस झालेले दोन कोटी ५० लाख ३३ हजार ०८८ जण आहेत. त्या खालोखाल म्हणजे दोन कोटी १६ लाख ६३ हजार ६२० जणांना उत्तर प्रदेशात दोन्ही डोस मिळाले आहेत.

वयनिहाय झालेले लसीकरण

  1. १८ ते ४४ ----- ४ कोटी ३० लाख ८२ हजार ५१०

  2. ४५ ते ६०-----२ कोटी ३७ लाख ३५ हजार ८७८

  3. ६० पेक्षा जास्त-----१ कोटी ६८ लाख २४ हजार ५७९

मुंबई, पुणे, ठाणे आघाडीवर

कोरोनाच्या उद्रेकाने होरपळलेले मुंबई, पुणे आणि ठाणे या शहरांमध्ये सर्वाधिक लसीकरण झाले आहे. दोन्ही डोस घेणाऱ्यांमध्ये मुंबई आघाडीवर आहे. तेथील ४५ लाख ३२ हजार २३० जणांचे पूर्ण लसीकरण झाले. पुण्यात ही संख्या ३५ लाख १६ हजारावर आहे. तर, ठाण्यात २२ लाख २३ हजार १४२ असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली.

हिंगोली, गडचिरोली, सिंधुदुर्ग पिछाडीवर

कोरोना उद्रेकाच्या दुसऱ्या लाटेत विदर्भातील आदिवासी जिल्ह्यांमध्येही कोरोनाबाधितांची संख्या वाढली. त्यामुळे तेथेही लसीकरण सुरू झाले. मात्र, राज्यातील सर्वांत कमी लसीकरण विदर्भातील हिंगोली आणि गडचिरोली तसेच, कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाल्याचे दिसते.

राज्यातील लसीकरण

  1. महिला -----३,८४,३६,८२२

  2. पुरूष -----४,५१,७३,६८४

या निकषांवर होते लस वितरण

  1. जिल्ह्याची लोकसंख्या

  2. लस घेण्यास पात्र नागरिकांची संख्या

  3. कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण

  4. यापूर्वी पुरवठा केलेल्या लशींचा वापर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil on Hasan Mushrif : मानाच्या गणपती पूजनानंतर सतेज पाटलांनी हसन मुश्रीफांना केलं टार्गेट; "गोकुळच्या निवडणुकीत पराभव दिसू लागला"

Asian Games Cricket : नेपाळचा ऐतिहासिक विजय, अफगाणिस्तानला नमवले; ब गटात हाँगकाँगचा विजय, भारताला कोण भिडणार?

Pune Ganpati Visarjan: पुण्यात विसर्जन मिरवणुकांमध्ये जिवंत देखावा; आई तुळजाभवानीचं साजिरं रूप पाहून भाविक भारावले, Video पाहा

Maharashtra Ganesh Visarjan Live: बीड जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे आणि लेझर लाईट वापरावर पूर्णपणे बंदी

Water Shortage: अवैध पाणी उपसा करणाऱ्या मोटारी प्रशासनाकडून जप्त

SCROLL FOR NEXT