accident news in pune sakal
पुणे

Pune : अपघातात प्राध्यापक महिला जागीच ठार, अंगावरून गेले डंपरचे चाक

आज सकाळी नऊच्या सुमारास सिंहगड रोडवर ही घटना घडली आहे.

सकाळ डिजिटल टीम

पुण्यात प्राध्यापक महिलेचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. दुचाकीवरून कामावर निघालेल्या प्राध्यापक महिलेच्या अंगावरून डंपरचे चाक गेल्याने ही महिला जागीच ठार झाली असल्याची माहिती समोल आली आहे. आज सकाळी नऊच्या सुमारास सिंहगड रोडवर ही घटना घडली आहे. वृषाली तुषार थिटे असे मयत महिलेचे नाव असून त्या प्राध्यापक आहेत. दरम्यान, या प्रकरणी सिंहगड रोड येथील पोलिस ठाण्यात डंपर चालका विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. (Accident News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वृषाली थिटे या नऱ्हेमध्ये असणाऱ्या झील कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या. नेहमीप्रमाणे आज सकाळी त्या कामावर दुचाकीवरून निघाल्या आहेत. वडगाव बुद्रुक येथील कॅनॉल शेजारी असलेल्या शिंदे मैदानाजवळ त्या आल्या असता तिकडून भरधाव आलेल्या डंपरने त्यांना धडक देताच वृषाली थेट चाकाखाली आल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, डंपर चालक फरार असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Drought : मुख्यमंत्र्यांसमोर व्यथा मांडणाऱ्या शेतकऱ्याला भाजप आमदाराची धक्काबुक्की? धाराशिवच्या व्हिडिओवरून दानवेंचा गंभीर आरोप

Ballarpur Hospital Incident : प्रसूतीदरम्यान मातेसह बालकाचा मृत्यू बल्लारपुरातील घटना; पोलिसांच्या मध्यस्थीनंतर परिस्थिती नियंत्रणात

Gadchiroli Collector : जिल्हाधिकाऱ्यांनी दुचाकीने केला दौरा दुर्गम भागातील रस्ते, पूल, आरोग्य, शिक्षणासह अन्य सुविधांची पाहणी

Latest Marathi News Live Update : चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत

Edible Oil Import Duty Cut : खाद्यतेलाचे दर उतरणार?, आयात शुल्कात मोठी कपात; सणासुदीत ग्राहकांना मोठा फायदा

SCROLL FOR NEXT