Pune Sakal
पुणे

Pune: राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्या मृणाल गांजाळे यांनी राबवलेले उपक्रम राज्यभरात राबविण्याची गरज - दिलीप वळसे पाटील

शैक्षणिक गुणवत्ता वाढ व जिल्हा परिषद शाळा मधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढीसाठी आवश्यक उपाययोजना बाबतही वळसे पाटील यांनी मृणाल गांजाळे यांच्या सोबत चर्चा केली.

डी के वळसे पाटील

मंचर - पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा स्तरावर राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्या शिक्षिका मृणाल गांजाळे शिंदे यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व आधुनिक तंत्रज्ञानाची गोडी निर्माण होण्यासाठी राबविलेले उपक्रम कौतुकास्पद आहेत. त्यांनीशिक्षण श्रेत्रात राबविलेले प्रयोग राज्यभरात राबवण्याची गरज आहे. असे राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

पिंपळगाव-खडकी (ता .आंबेगाव) येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका मृणाल गांजाळे शिंदे यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल वळसे पाटील यांनी गांजाळे यांच्या मंचर निवासस्थानी भेट देऊन त्यांचा सन्मान केला.या प्रसंगी गांजाळे शिंदे यांचे सासरे बबनराव शिंदे, वडील नंदकिशोर गांजाळे, सासू शोभा शिंदे, पती मयूर शिंदे,

आई रंजना गांजाळे, बहिण भारती ढेरंगे, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विष्णू हिंगे पाटील , मथा जी पोखरकर,प्रवीण मोरडे,सतीश बेंडे, सुहास बाणखेले, सुनील पोखरकर उपस्थित होते. शैक्षणिक गुणवत्ता वाढ व जिल्हा परिषद शाळा मधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढीसाठी आवश्यक उपाययोजना बाबतही वळसे पाटील यांनी मृणाल गांजाळे यांच्या सोबत चर्चा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Leopard Attack : कुत्र्यांनी वाचवले मालकाचे प्राण! मेंढपाळांवर बिबट्याचा हल्ला; मात्र कुत्र्यांनी केलेला हल्ल्यात बिबट्याचा मृत्यू

Thane Traffic: बाप्पाच्या आगमनात खड्ड्यांचे विघ्न! मार्गावर तब्बल ८०० खड्ड्यांच साम्राज्य

Pune Election: नव्या प्रभाग रचनेमुळे १६ प्रभागांमध्ये गडबड; ६४ नगरसेवकांवर थेट परिणाम; 'या' पक्षांना बसणार फटका

Pune News : पतीला अर्ध यकृत दिल, प्रत्यारोपणनंतर पत्नीसह दोघांचाही मृत्यू; पुण्यातील रुग्णालयात घटनेने खळबळ

दोन महिन्यात उजनीतून सोडले 97 TMC पाणी! उजनी धरणाचे 16 दरवाजे 3 फुटाने उघडले; भीमा नदीतील विसर्ग 45 हजार क्युसेक, पंढरीतील पूरस्थिती आज पूर्वपदावर

SCROLL FOR NEXT