पुणे

पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील मेट्रो स्थानकांच्या कामांना वेग

सकाळवृत्तसेवा

पुणे - मेट्रोची ‘ट्रायल रन’ झाल्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील प्राधान्यक्रमाच्या मेट्रोच्या चारही स्थानकांच्या कामांना वेग आला आहे. पिंपरी चिंचवडमधील मेट्रो ऑगस्टअखेर कार्यान्वित होणार असल्याचेही महामेट्रोकडून स्पष्ट केले. संत तुकारामनगर स्थानकाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. 

पिंपरी चिंचवड-स्वारगेट (१५ किलोमीटर) आणि वनाज-रामवाडी (१६ किलोमीटर) मार्गावरील मेट्रो प्रकल्पाचे काम सुमारे ४८ टक्के पूर्ण झाले आहे. संत तुकारामनगर ते फुगेवाडी आणि वनाज ते गरवारे महाविद्यालय दरम्यान अनुक्रमे सहा आणि पाच किलोमीटर मार्गावर या वर्षात मेट्रो धावणार आहे. या मार्गावरील संत तुकारामनगर ते फुगेवाडी दरम्यान मेट्रो धावणार आहे. दोन्ही स्थानकांची कामे अनुक्रमे ९५ टक्के आणि ८३ टक्के पूर्ण झाली आहेत. या मार्गावर स्थानकाच्या दोन्ही बाजूंना सरकते जिने उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पुढच्या टप्प्यात तिकीट खिडकी उभारणे आणि प्रवासी केंद्रित सुविधा निर्माण करणे, यावर भर असल्याची माहिती महामेट्रोचे महाव्यवस्थापक हेमंत सोनवणे यांनी दिली. दुसऱ्या टप्प्यात वनाज ते गरवारे महाविद्यालय दरम्यान मेट्रो धावणार आहे. वनाज स्थानकाचे ३६ टक्के तर, गरवारे महाविद्यालय स्थानकाचे काम ५१ टक्के पूर्ण झाले आहे.दुसऱ्या टप्प्यातील मार्गाचे काम डिसेंबरअखेर पूर्ण होणार आहे. 

प्रत्येक डब्यात ३०० प्रवासी 
प्राधान्यक्रमाच्या मार्गावर मेट्रोला तीन डबे असतील. प्रत्येक डब्यात सुमारे ३०० प्रवासी सामावू शकतील. त्यातील ७२ प्रवाशांना बसायला जागा मिळेल. हे डबे वातानुकूलित असून त्यात मोबाईल चार्जिंगचीही सुविधा प्रवाशांना उपलब्ध होणार आहे. प्रवासी संख्या वाढल्यावर मेट्रोच्या इंजिनला सहा डबे लावता येतील. त्यामुळे पहिल्या टप्प्यात कमाल ९०० प्रवासी तर दुसऱ्या टप्प्यात १८०० प्रवाशांची वाहतूक एकाच वेळी एका फेरीत शक्य होणार आहे, असे महामेट्रोने स्पष्ट केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT