Pune autorickshaw drivers strike now punekar: पुण्यातील रिक्षाचालकांनी पुन्हा एकदा बंदची हाक दिली आहे. यामुळे सर्वसामान्य पुणेकर मात्र मेटाकुटीला आला आहे. काही दिवसांपूर्वी देखील पुण्यातील रिक्षाचालकांनी आक्रमक धोरण अवलंबून काही करुन सरकारनं आपल्या मागण्या पूर्ण कराव्यात म्हणून एल्गार पुकारला होता.
सोमवारी सकाळपासून पुण्यातील रिक्षाचालक भलतेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. त्यांच्या आक्रमकपणाचा परिणाम मात्र सर्वसामान्य नागरिकांवर झाला आहे. दिवसभरामध्ये शहरातील रिक्षा बंद होत्या. ओला उबेरही तुरळक स्वरुपात सुरु होत्या. काहींनी तर अव्वाच्या सव्वा दर आकारण्यासही सुरुवात केली होती. त्यामुळे नागरिकांना मनस्तापाला सामोरं जावं लागल्याचे दिसून आले.
गेल्या ९ तासांहून अधिक काळ पुण्यातील रिक्षा चालकांचा संप अजूनही सुरूच आहे. त्यामुळे आता पुणेकरांची चिंता वाढली आहे. पुण्यातील रिक्षा चालकांचे चक्का जाम आंदोलनानं पुणेकरांचे लक्ष वेधून घेतले आहे. मात्र प्रशासनानं त्या आंदोलनाची दखल घ्यावी यासाठी रिक्षा चालक रस्त्यावर रिक्षा ठेवून निघून गेले आहेत. त्यांनी शहरातील आरटीओ कार्यालयासमोर ९ तासापासून रिक्षा चालकांचा ठिय्या दिसून आला आहे.
रिक्षा चालकांनी रस्ता जाम केल्याने पुणेकरांचा खोळंबा झाला होता. आर टी ओ कार्यालय चौकातील वाहतूक बंद करण्यात आली होती. संचेती हॉस्पिटल पासून पुणे रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता देखील बंद होता. जुना बाजार चौकतून आर टी ओ कार्यालयाकडे जाणारा रस्ता आणि जहांगीर हॉस्पिटल चौकापासून संचेती हॉस्पिटल कडे जाणारा रस्ता बंद झाल्यानं मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
रिक्षा चालकांनी रिक्षा रस्त्यावर सोडून काही रिक्षा चालक चक्क घरी निघुन गेल्यानं आणखी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. रिक्षाचालक हे अजूनही रिक्षा चालक त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसून आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.