Corona
Corona 
पुणे

कोरोनाग्रस्तांच्या आकड्याने बारामतीकरांचे धाबे दणाणले

मिलिंद संगई

बारामती- शहरातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्याने आज 80 चा टप्पा ओलांडल्याने बारामतीकरांचे धाबे दणाणले. अचानकच रुग्णांची संख्या इतक्या मोठ्या संख्येने वाढल्याने प्रशासन आता कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे. बारामती शहरात काल खासगी व सरकारी मिळून जवळपास 425 रुग्णांची तपासणी करण्यात आली, यामध्ये 80 जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. दरम्यान बारामती शहरातील एमआयडीसी परिसरातील एकाच कुटुंबातील तब्बल अकरा जण पॉझिटिव्ह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

बारामती शहरात तसेच एमआयडीसी परिसरातील रुग्णांची संख्या अचानक वाढल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली. पोलीस, नगरपालिका, आरोग्य विभाग यांच्या वतीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात असल्या तरी, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, लग्न समारंभ तसेच पार्टी यासारख्या बाबी टाळण्याची आवश्यकता प्रशासनाने बोलून दाखवली आहे.

हातभट्ट्यांच्या जागेवर चिमुकल्यांसाठी मैदान ! मुळेगाव तांड्याची ओळख पुसण्यासाठी...

विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई होत असली तरी लोकांनी आपण होऊन जास्त सॅनिटायझरचा वापर, तसेच सोशल डिस्टंसिंग पाळणे आवश्यक असल्याचे डॉ. खोमणे म्हणाले. दरम्यान बारामती शहरातील सिल्व्हर ज्युबिली रुग्णालय, रुई ग्रामीण रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अशा तिन्ही ठिकाणी कोरोना चाचणी घेण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली असून सकाळी दहा ते दुपारी दोन या कालावधीत ही तपासणी केली जाणार आहे.

लोकांचा संयम गरजेचा.....

लग्नसमारंभाच्या संख्येवर मर्यादा आणल्यानंतर लोक आता शेतामध्ये विवाहसमारंभ घेऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कमालीची काळजी घेण्याची गरज प्रशासनाने बोलून दाखवली आहे. कोणत्याही स्वरूपात एकत्र येणे टाळले पाहिजे, ज्या ठिकाणी आपण एकमेकांच्या संपर्कात येत होती ते अनिवार्यपणे मास्क वापर करणे गरजेचे आहे.

लसीकरणामध्ये सहभागी व्हावे....

साठ वर्षांहून अधिक वय असलेल्या प्रत्येकाने लस घेणे गरजेचे आहे, तसेच ज्यांचे वय 45 हून अधिक आहे व ज्यांना असाध्य व्याधी आहेत अशांनी ही लस टोचून घेणे गरजेचे आहे. शहरातील सर्व प्रमुख खासगी रुग्णालय तसेच शासकीय रुग्णालयासहित प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ही लस देण्याचे काम सुरू आहे. लसीकरणाच्या मोहिमेमध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

चाचण्या वाढवण्यावर भर....

दरम्यान बारामती शहर व तालुक्यांमधील चाचण्यांची संख्या वाढविण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहे. दररोज किमान एक हजार जणांच्या चाचण्या करा असे त्यांनी सुचविले आहे.  जितक्या चाचण्या जास्त होतील तितके रुग्ण समोर येतील व कोरोनाची साखळी तोडण्यास त्याची मदत होईल असा यामागचा उद्देश आहे.

•    सोमवारी तपासलेले आरटीपीसीआर नमुने-  325.  एकूण पॉझिटिव्ह-47.
•      इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -04.  
•    सोमवारी तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण आरटीपीसीआर-24 त्यापैकी पॉझिटिव्ह -07.                
•    कालचे एकूण एंटीजन 48-  एकूण पॉझिटिव्ह-26. 
•    सोमवारी दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   47+07+26=80.
•     शहर-56. ग्रामीण- 24.        
•    एकूण रूग्णसंख्या-7214 - एकूण बरे झालेले रुग्ण- 6638 
•    एकूण मृत्यू-- 147.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT