Pune a boy was attacked with sharp weapon due to disputes in the lockdown 
पुणे

लॉकडाऊनमधील भांडणाच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार

सकाळवृत्तसेवा

पुणे : लॉकडाऊनमध्ये झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन तिघांनी तरुणावर कोयत्याने वार करुन त्यास जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना शनिवारी रात्री साडे आठ वाजता वारजे येथील म्हाडा वसाहतीमध्ये घडली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अक्षय कांबळे, नीलेश सातपुते, व सागर शेलार अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत. रोहित पासलकर असे या घटनेत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अतुल पडवळ (वय 24, रा.म्हाडा वसाहत, वारजे) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व रोहित हे दोघेही एकमेकांचे मित्र असून एकाच वसाहतीमध्ये राहतात. लॉकडाऊन सुरु असताना एप्रिल महिन्यात वारजे येथील म्हाडा पुलाखाली जगदीश पारधे याची काही जणाबरोबर भांडणे झाली होती, त्यावरुन जगदिशला पोलिसांनी अटक केली होती. याच जगदीश पारधे हा रोहित सोबत असायचा. तसेच लॉकडाऊनमध्ये झालेली भांडणे ही रोहितच्या सांगण्यावरुनच झाली, असा अक्षय कांबळे याला संशय होता, त्याचाच राग अक्षयच्या मनात होता. त्यावरुनच रोहित व अक्षय यांच्यात वाद झाले होते.

पुणेकरांनो, रक्तदानासाठी पुढे या!

दरम्यान, शनिवारी रात्री फिर्यादी हे रोहितची दुचाकी दुरुस्त करीत होते. फिर्यादी, रोहित व त्यांचा मित्र लक्ष्मण शेडगे गाडी दुरुस्त करण्यात व्यस्त होते. त्यावेळी अक्षय हा नीलेश व सागर असे तिघेजण तेथे आले. त्यांनी रोहितला शिवीगाळ करीत "जिवंत सोडायचे नाही याला, ठार मारायचे" असे ओरडत लाथाबुक्यानी मारहाण केली. तसेच अक्षय व त्याच्या साथीदारांनी त्यांच्याकडील कोयत्याने रोहितवर वार केले. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर रोहितला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

पत्रकारांच्या विमा संरक्षणाबाबत उपमुख्यमंत्र्यांनी दिले संकेत; अधिवेशनात मांडणार मुद्दा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : ज्वेलर्सचे सुरक्षा रक्षक भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT