Corona Pune 
पुणे

पुण्यातील कॅन्टोन्मेंट भागात रुग्णविस्फोट; कोरोना रुग्णांमध्ये प्रंचड वाढ

सकाळवृत्तसेवा

पुणे : पुण्यातील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत गेल्या दहा दिवसांपासून कोरोनाच्या रूग्णात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे बोर्ड प्रशासनन सजग झाले आहे. पटेल रूग्णालयाचे कर्मचारी तसेच वैद्यकीय अधिकारी यांची टीम कोरोनाच्या रूग्णांवर सध्या उपचार करीत आहेत. या रुग्णांमधील तीन रूग्णांची स्थिती गंभीर आहे. त्यामुळे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.  गेल्या दहा ते पंधरा दिवसात कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत 225 रूग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 40 जणांवर पटेल रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर 150 रूग्णांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

याबाबत माहिती देताना पटेल रूग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्याधर गायकवाड म्हणाले,“ कॅन्टोन्मेंट भागात रूग्ण वाढत असले तरी त्यांच्यावर उपचार करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. सध्या प्रत्येक वॉर्डामध्ये जाऊन नागरिकांच्या तपासण्या सुरू आहेत. कॅन्टोन्मेंट  बोर्डाच्या हद्दीत गेल्या जानेवारी महिन्यापासून कोरोना लस देण्यास सुरूवात झाली आहे. आतापर्यत सुमारे पाच हजार जणांचे लसीकरण  करण्यात आले आहे. हे लसीकरण नियमानुसार करण्यात येत आहे.

पुण्यातील रुग्णसंख्या गगनाला

पुण्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला आहे. देशात महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात पुण्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद होत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत देखील पुण्याची स्थिती अत्यंत गंभीर बनली होती. आणि आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देखील पुण्याचाच क्रमांक वरती आहे. पुण्यातील ही परिस्थिती पाहता पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी लॉकडाऊनचे संकेत देत येत्या दोन एप्रिल रोजी याबाबतचा निर्णय घेऊ, असे जाहीर केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Police Action : पालकमंत्र्यांचाही आदेश झुगारला! साताऱ्यात पोलिसांनी मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन करून कोणाला उचललं? हॉटेल रेडबटनवर रात्री 2 वाजता काय घडलं?

Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांनी खरच अनामिका बोट कापलं? २ सप्टेंबरला नेमकं काय घडलं? स्वत: दिलं स्पष्टीकरण...

अमरावतीत गॅस एजन्सीचा मनमानी कारभार; ग्राहकाच्या नावे परस्पर सिलिंडरची उचल, विना बुकिंग 'डिलिव्हरी'चा येतोय मेसेज

Sports News: महाराष्ट्रात कुस्ती पंचगिरीची परिस्थिती: तुटपुंजे मानधन आणि अवहेलनेमुळे आव्हाने

Latest Marathi News Live Update : स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात प्रकरणी दीपक केसरकरांच्या निकटवर्तीयाची SIT चौकशी

SCROLL FOR NEXT