10 th result Sakal
पुणे

Pune : संस्थास्तरावरील प्रवेशांवर सीईटी सेलची करडी नजर

या पुस्तिकेतील नियम व सूचनांचे तंतोतंत पाल करून संस्थेत ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात यावी, असा आदेश सीईटी सेलचे आयुक्त महेंद्र वारभुवन यांनी पत्राद्वारे दिला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Pune - पदवी आणि पदव्युत्तर पदवी व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशांच्या तीन फेऱ्या झाल्या आहेत. आता उर्वरित रिक्त जागा संस्था स्तरावर भरल्या जाणार आहेत. मात्र संस्थावरील प्रवेश प्रक्रिया नियमानुसार आणि गुणवत्तेनुसार राबविण्यात यावीत, असा आदेश महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) दिला आहे.

संस्थास्तरावरील प्रवेशादरम्यान महाविद्यालयांनी नियम, सूचनांचे पालन न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सीईटी सेलने दिला आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातंर्गत असलेल्या तंत्रशिक्षण विभागातील विविध पदवी आणि पदव्युत्तर पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. या प्रवेश प्रक्रियेची तिसरी फेरी संपन्न झाल्यानंतर उर्वरित राहिलेल्या रिक्त जागा आणि संस्थास्तरावरील जागांच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात सीईटी सेलने माहिती पुस्तिका प्रसिद्ध केली आहे.

या पुस्तिकेतील नियम व सूचनांचे तंतोतंत पाल करून संस्थेत ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात यावी, असा आदेश सीईटी सेलचे आयुक्त महेंद्र वारभुवन यांनी पत्राद्वारे दिला आहे. या प्रवेश प्रक्रियेच्या माहिती पुस्तिकेमधील नियम, सूचनांचे पालन करणार नाही, अशा महाविद्यालयांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

ही प्रवेश प्रक्रिया राबविताना सर्व प्रवेश गुणवत्ता क्रमांकानुसारच देण्यात यावेत. तसेच विद्यार्थ्यांनी केलेल्या अर्जांची यादी आणि त्यांची अंतिम गुणवत्ता यादी संस्थेच्या संकेतस्थळावर त्याचदिवशी प्रसिद्ध करण्यात यावी आणि सीईटी कक्षाच्या माहितीकरिता सदरील यादी ई-मेलद्वारे पाठवावा, अशी सूचनाही सीईटी सेलने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Relief: प्रति कोंबडी १०० रुपये, विहिरीत गाळ गेलेल्यांना किती रुपये? संपूर्ण नुकसानभरपाई समजून घ्या

Maharashtra Flood Relief: कर्नाटकच्या तुलनेत महाराष्ट्र सरकारने किती मदत केली? शेतकऱ्यांच्या खात्यात कधी पैसे पडणार

Stock Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; कोणते शेअर्स वाढले?

Latest Marathi News Live Update : राज्य सरकार विरोधात बच्चू कडू यांचा रास्ता रोको आंदोलन सुरू

Viral Video: ट्रेनमध्ये चहा विकता विकता तो झोपी गेला अन् तेवढ्यात... माणुसकीचे दर्शन घडविणारा हृदस्पर्शी व्हिडिओ

SCROLL FOR NEXT