CM_Uddhav_Thackeray 
पुणे

पुणे व्यापारी महासंघाने मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र; काय केली मागणी पाहा!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय नाही. त्यामुळे 23 जुलैनंतर पुन्हा लॉकडाऊन वाढवू नये, अशी मागणी पुणे व्यापारी महासंघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडे एका पत्राद्वारे केली आहे. त्याऐवजी शनिवार आणि रविवार या दोन दिवसच लॉकडाऊन ठेवण्यात यावा, अन्य दिवशी दुकाने खुली ठेवण्यास परवानगी द्यावी, यासह विविध पर्यायही महासंघाच्या वतीने प्रशासनाला सुचविण्यात आले आहे. 

पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका आणि सचिव महेंद्र पितळिया यांनी या संदर्भातील निवेदन मुख्यमंत्री, पालकमंत्री, महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना दिले आहे. तीन महिन्यांच्या लॉकडाऊन नंतर व्यवसायाला कशीबशी सुरवात होत असताना पुन्हा एकदा लॉकडाऊन लादल्याने व्यापारी त्रस्त झाले आहेत. केवळ व्यापारी नव्हे, तर त्यांच्यावर अवलंबून असलेल्या 10 लाख कर्मचाऱ्यांचे जीवन अडचणीत आले आहे.

त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. व्यापारी आर्थिक संकटात सापडले आहेत. पुन्हा लॉकडाऊन लादल्यास त्यातून उद्रेक झाल्यास त्यास सर्वश्री सरकार जबाबदार राहील. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊनची मुदत वाढवू नये, असेही या निवेदनात म्हटले आहे. 

लॉकडाऊनऐवजी दुकाने सकाळी दहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी द्यावी, अथवा सोमवार ते शुक्रवार सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत सुरू ठेवण्यास व शनिवार आणि रविवारी संपूर्ण दोन दिवस लॉकडाऊन करण्यात यावा, नियम न पाळणाऱ्या दुकानांवर कारवाई करून ती तीन दिवस सील करण्यात यावी, असे पर्यायही महासंघाच्या वतीने प्रशासनाला सुचविण्यात आले आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उच्चशिक्षितांना मोठा धक्का! कमी शिक्षण असलेल्यांसाठी राखीव पदांवर दावा करता येणार नाही; Supreme Court चा महत्त्वाचा निर्णय

Tuljapur Temple: भवानीमातेच्या दर्शनासाठी भाविकांची लूट, तुळजापूरमध्ये बोगस पुजारी, लुटारू एजंटांकडून श्रद्धेचा बाजार

Latest Marathi News Live Update : राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे यांचा विधान परिषदेत जाण्याचा मार्ग मोकळा

Shahuwadi Robbery : शाहूवाडीतील दुर्गम भागातील पाटीलवाडीत दरोडा; मायलेक जखमी, सोने, पैसे सगळेच लुटले

'दुप्पट परतावा’च्या आमिषाला पोलीसही बळी... कोल्हापुरातील रॅकेटची राज्यभर चर्चा; गुन्ह्याचा तपास करणारेच कसे अडकले?

SCROLL FOR NEXT