CoronaVirus 
पुणे

पुणे शहरात गुरुवारी एकाच दिवसात नवे ९३७ रुग्ण सापडले

सकाळवृत्तसेवा

पुणे - पुणेकरांच्या चिंतेत भर टाकणाऱ्या कोरोनाचा आवाका आता आणखीनच वाढू लागला आहे. गुरुवारी एकाच दिवसात शहरात नवे ९३७ रुग्ण सापडले आहेत. दुसरीकडे दिलासाही मिळाला असून, दिवसभरात सव्वासहाशे रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर १४ रुग्ण दगावले आहेत. मृतांचा आतापर्यंतचा आकडा पावणेसातशेवर पोचला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या  ६ हजार ६९५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात कोरोनाचा संपर्क झपाट्याने होऊ लागला असून, या आठवड्यात रोज सरासरी सहाशे रुग्ण सापडत होते. गेल्या दोन दिवसांत त्यात वाढ होऊन रोजचा आकडा सातशेच्या पुढे जाऊ लागला आहे. बुधवारी ८७७ रुग्ण सापडल्याने प्रचंड भीती निर्माण झाली असतानाच गुरुवारी पुन्हा ९३७ रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात ४ हजार ४१० नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.

शहरात आतापर्यंत सुमारे १ लाख २४ हजार १९८ नागरिकांची तपासणी झाली आहे. त्यापैकीच्या १९ हजार ४२ जणांना कोरोना झाला होता. त्यातील ११ हजार ६७१ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे सध्या ६ हजार ६९५ जण रुग्णालयांत आहेत.

पिंपरीत सापडले २३१ पॉझिटिव्ह
पिंपरी - शहरात गुरुवारी २३१ रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ३६०७ झाली. दिवसभरात ११५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर पुण्यातील एका ७२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. सध्या १४०५ जण उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत एकूण २१५४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत ४८ जणांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'आम्ही १५ वर्षांचे असताना असे नव्हतो...' Vaibhav Sooryavanshi बद्दल अभिषेक शर्मा नेमकं काय म्हणाला?

Gangapur News : अल्पवयीन पीडितेवर अत्याचार प्रकरणात आरोपीला ७ वर्षे सश्रम कारावास; गंगापूर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

विजय साळगावकर सुटलाच नसता, 'दृश्यम ३' मध्ये सगळ्यात मोठी चूक; पोलिसांनी दुर्लक्षित केली ती गोष्ट, तुम्हाला कळली का?

Wani News : दिंडोरीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने रास्ता रोको; शेतकरी, आदिवासी व नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन, दुष्काळी यादीत तालुक्याचा समावेश करण्याची मागणी

FlyDubai Co-Pilot Case : इस्रायलमध्ये विमान क्रॅश करण्याचा कट; फ्लाईदुबईच्या को-पायलटला होणार 'फायरिंग स्क्वॉड'द्वारे मृत्युदंड?

SCROLL FOR NEXT