Crime_Arrest
Crime_Arrest 
पुणे

पुण्यात गुन्हेगारांची झाडाझडती; 'कोम्बिंग ऑपरेशन'द्वारे ५५ जणांना अटक

सकाळ वृत्तसेवा

पुणे : गुन्हे करण्यासाठी विविध प्रकारची शस्त्रे बाळगत नागरिकांत दहशत निर्माण करणे आणि इतर प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी पुणे शहरातील पोलिस ठाणे आणि गुन्हे शाखेने संयुक्त कोम्बिंग ऑपरेशन करीत, सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेतली. या प्रतिबंधात्मक कारवाईत आर्म ऍक्‍टनुसार 55 गुन्हेगारांना अटक करण्यात आली.

मंगळवारी (ता. 15) रात्री नऊ ते एक दरम्यान केलेल्या कारवाईत दोन गावठी कट्टे, देशी बनावटीची तीन पिस्तूल, नऊ काडतुसे, 40 कोयते, पाच तलवारी, 1 कुकरी, दोन पालघन आणि एक सुरा अशी शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलिस आयुक्त रवींद्र शिसवे, अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे, पोलिस उपायुक्त (गुन्हे) बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. परिमंडळ 1 ते 5 आणि गुन्हे शाखेने अधिकारी व कर्मचारी यांची पथके स्थापन केली. त्यांनी शहरातील वेगवेगळ्या परिसरातील झोपडपट्टी परिसरात कोम्बिंग ऑपरेशन केली.

शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी या पुढेही अचानकपणे कोम्बिंग ऑपरेशन करण्यात येणार असल्याची माहिती गुप्ता यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. आर्म ऍक्‍ट कलम 3/25 प्रमाणे एकूण पाच गुन्हे दाखल करून, पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून दोन गावठी कट्टे, तीन गावठी पिस्तूल व नऊ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

जप्त मुद्देमाल :
कोयते : 40
तलवारी : 5
कुकरी : 1
पालघन : 2
सुरा : 1

संशयितपणे फिरणाऱ्यांवर कारवाई
महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 142 प्रमाणे 223 तडीपार व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एकूण 9 तडीपारांना तडीपारी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 122 प्रमाणे संशयितपणे फिरणाऱ्या 21 व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे.

- कोम्बिंग ऑपरेशनमध्ये एकूण 1213 गुन्हेगारांची तपासणी
- त्यात 572 गुन्हेगार मिळाले
- त्यातील 372 टॉप-20 गुन्हेगारांमधील 215 गुन्हेगार सापडले
- पॅरोलवर सुटलेले 121 गुन्हेगार तपासले असता, त्यातील 73 सापडले
- फरार असलेले 190 आरोपींची चौकशी केली असता, दोघे आढळले

गुन्हा तपासलेले गुन्हेगार सापडलेले गुन्हेगार
वाहन चोरी 49 10
जबरी चोरी 17 2
शारीरीक गुन्हे 7 6

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kiran Sarnaik: आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील ४ जणांचा अपघातात मृत्यू! पातूरमध्ये भीषण अपघात

Pune Traffic Update: उद्यापासून पुणे वाहतुकीत गर्डर लॉचिंग कामामुळे मोठे बदल, कोणते असतील पर्याय मार्ग?

Kapil Sharma : 'द ग्रेट इंडियन कपिल शो'साठी कपिल शर्मा घेतो 'इतकं' मानधन !

Chitra Wagh: "चित्रा वाघ यांनी माफी मागावी अन्यथा..."; 'पॉर्नस्टार' प्रकरणावर अभिनेत्याचा गंभीर इशारा

RBI: गुंतवणूकदार मालामाल! रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

SCROLL FOR NEXT