Pune_Crime 
पुणे

दिवाणजीला लुटणाऱ्या तिघांना २४ तासांत पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मार्केटयार्डमधील व्यावसायिकाची रोकड बँकेत भरण्यासाठी निघालेल्या दिवाणजीला रॉडने हल्ला करत लुटणाऱ्या तिघांना पोलिसांनी २४ तासांत अटक केली आहे. 
गुन्हे शाखा, खंडणी व अंमली पदार्थविरोधी पथकाने ही कारवाई केली.

थापा उर्फ विकास गोविंद कांबळे (वय २१, रा. लोहियानगर), मयूर सुरेश जाधव (वय १९) आणि अक्षय रमेश नवले (वय १९, दोघे रा. जनता वसाहत) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. यातील कांबळे आणि नवले हे दोघे सराईत आहेत. चोरीची रोकड आणि दुचाकी असा तीन लाख ६३ हजारांचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त करण्यात आला आहे. त्यांना पुढील तपासासाठी मार्केटयार्ड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

याबाबत तेलाचे व्यापारी नहार यांच्याकडे दिवाणजी म्हणून नोकरीस असलेल्या सुमंतीलाल चंदनलाल ओस्तवाल (वय ६९, रा. गंगानगर, आकुर्डी प्राधिकरण) यांनी फिर्याद दिली. घटनेच्या आदल्या दिवशीही त्यांनी सापळा रचला होता. मात्र दिवाणजी पैसे भरण्यासाठी गेले नाहीत. त्यानंतर परत दुसऱ्या दिवशी तिघांनी सापळा रचला. त्यावेळी ते बॅगेत पैसे घेऊन निघालेले दिसले. वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोहिते यांच्या सूचनेनुसार पोलिस उपनिरीक्षक दत्ताजी मोहिते, हवालदार उदय काळभोर आणि टीमने सापळा रचून तिघांना अटक केली.

दिवाणजीवर पाळत ठेऊन साधला डाव : 
कांबळे दोन महिन्यांपूर्वी तेल घेण्यासाठी दिवाणजी कार्यरत असलेल्या दुकानात आला होता. त्यावेळी त्याने दिवसभराचा दुकानातील गल्ला पाहिला होता. दिवाणजी गल्ल्यातील पैसे बँकेत भरायला कधी जातात याची माहिती घेण्यासाठी आरोपींनी तीन दिवस त्यांच्यावर पाळत ठेवून रेकी केली. 

अशी मिळाली आरोपींची माहिती : 
गुन्ह्याच्या तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्‍लेषणाच्या आधारे आरोपींची ओळख पटली होती. पोलिस कर्मचारी रमेश चौधर यांना तिघे आरोपी रामटेकडी परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांना अटक करण्यात आली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT