Pune-Traffic-Police 
पुणे

पुणेकरांच्या बेशिस्तीचे घडले दर्शन; नियम मोडणाऱ्या 'इतक्या' नागरिकांवर गुन्हे दाखल!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाशी संबंधित नियम न पाळणे, रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकावर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. तीन ते सात जुलैदरम्यान 262 वाहने जप्त केली असून 2 हजार 432 नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शहरासह जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णाची संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी पोलिस तसेच प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. मात्र, त्याउलट नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसून येत आहेत. त्यामुळे नियम न पळणाऱ्यावर पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे.

मास्क न घालणे (778), सोशल डिस्टनसिंगचे नियम न पाळणे (3), तीनपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक (107), वेळेचे बंधन न पळता दुकाने उघडी ठेवणे (45), विनाकारण रस्त्यावर पायी फिरणे (901), विनाकारण गाडीवर फिरणे (336) गुन्हे दाखल केले. तर 262 वाहने जप्त केली आहेत. असे एकूण 2 हजार 432 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिस उपायुक्त (गुन्हे शाखा) बच्चन सिंग यांनी दिली. प्रतिबंधित भागात 94 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. शहरात रात्री 10 ते पहाटे 5 या वेळेत संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.

कोरोना संदर्भात नियम मोडल्याप्रकणी चार दिवसांत दोन हजार 432 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुणेकर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी आणि नियमांचे पालन करावे. लॉकडाऊनच्या काळात नियमांचे पालन न करणाऱ्यांवर यापुढेही कारवाई सुरूच राहणार आहे. 
- डॉ. के. व्यंकटेशम, पोलिस आयुक्त, पुणे शहर 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अशी केली कारवाई : 
- मास्क न घालणे - 778
- सोशल डिस्टन्स न पाळणे - 3
- तीनपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक - 107
- वेळेचे बंधन न पळता दुकाने उघडी ठेवणे - 45
- विनाकारण रस्त्यावर पायी फिरणे - 901  
- विनाकारण गाडीवर फिरणे - 336
- जप्त केलेली वाहने - 262

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'38 मध्ये नवऱ्याची भेट, 39 मध्ये लग्न आणि..' जुई गडकरीला कसं हवय वैवाहिक आयुष्य? पोस्ट शेअर करत म्हणाली...

Provident Fund: तुम्ही सॅलरी अकाउंट बदललं? ‘हे’ काम नाही केलं तर PF चे पैसे अडकू शकतात!

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील एआय इम्पॅक्ट समिटने एआय जगातील हुशार लोकांना एकत्र आणले- पंतप्रधान मोदी

Narhari Zirwal clerk action : नरहरी झिरवळ यांच्या खात्यातील लिपिकावर कारवाई; चौकशी अहवाल येईपर्यंत खाजगी सचिवांचा कार्यभार थांबवला

Deputy CM Sunetra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय सुनेत्रा पवार यांच्या कोर्टात; अध्यक्ष निवडीचा पेच कायम, जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांचा निर्णय

SCROLL FOR NEXT